तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घराघरात पोहचलेली जोडी राणादा आणि अंजली बाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर. हे दोघंही खऱ्या आयुष्यातही लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांचा मे महिन्यात साखरपूडा झाला आहे. पण सध्या ते त्यांच्या लंडन ट्रिपमुळे चर्चेत आहेत.
हार्दिक आणि अक्षया लंडन शहरात फिरायला गेलेले त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून समजत आहे. त्यांनी सोशल मीडियावर तेथील फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. त्यांचे रोमँटिक फोटो व्हायरलही होत असून त्यावर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतोय.
View this post on Instagram
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)