आरारारा खतरनाक..! हिमांशी गोस्वामीचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, व्हिडिओ पाहून चाहते झाले भलतेच खुश

आरारारा खतरनाक..! हिमांशी गोस्वामीचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, व्हिडिओ पाहून चाहते झाले भलतेच खुश


सोशल मीडियावर ‘दो गज का घुंघट’ गाण्याने प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळवल्यानंतर सध्या हिमांशी गोस्वामी हीच्या नव्या गाण्याची भलतीच क्रेज असलेली दिसून येत आहे. सध्या सर्वत्र गल्लीबोळात तिचे नवे गाणे वाजताना दिसत आहे

हरियाणाची ही उदयोन्मुख कलाकार, अभिनेत्री, डान्सर आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे प्रेम प्राप्त करताना दिसत आहे. हिमांशी ही तिच्या नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत येत असते.

नुकतेच तिचे ‘गामा आली’ हे गाणे रिलीज झाले असून. गाणे रिलीज झाल्यापासूनच या गाण्याचे लाखो व्ह्युव्ज झाल्याचे दिसून येत आहे. त्यावर प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अल्पावधीतच तिचे हे गाणं युट्यूबवर चांगलेच प्रसिद्ध झाले आहे.

हिमांशी ही त्या कलाकारांमध्ये गणली जाते, जी केवळ हरियाणापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण जगभरात तीची ओळख आहे. ‘गामा अली’ या गाण्याने तिच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली आहे. या गाण्याने चाहत्यांना भलतंच वेड लावलंय. या गाण्याच्या आनंद घेताना पुन्हा-पुन्हा हेच गाणं लावून रसिक आपले मनोरंजक करून घेत आहेत.

एम के सिस्टर यांनी हे गाणे गायले असून, या गाण्याचे दिग्दर्शक एस. के बिब्बा आहेत. गाण्याची निर्मिती चांगल्या प्रकारे केलेली असून, हे गाणं चाहत्यांना आकर्षित देखील तितकेच करत आहे.

हिमांशीने हरियानवी गाण्यात खूप वेळा आपल्या गाण्याने चाहत्यांना खुश केले आहे. त्याचप्रमाणे हे गाणे लाखोंच्या घरात चाहत्यांनी पाहिले आहे. सोबतच तीचे ‘बहू अनपढ की’ आणि ‘पिहर आली बस’ हे दोन्ही गाणे फारच लोकप्रिय झाले होते. परंतु तिच्या ‘दो गज का घुंघट’ हे गाणे रिलीज होताच, प्रत्येकाच्या तोंडून तेच गाणे ऐकायला मिळत होते. लोकांच्या प्रति तिची क्रेझ खूपच वाढली असल्याचे दिसून येत आहे. लहानापासून ते मोठयापर्यंत प्रत्येक जण हिमांशीच्या गाण्याचे चाहते बनले आहेत.

काही महिन्यांपूर्वी हिमांशीच्या ह्या गाण्यावर एक लहान मुलीने काळ्या कपड्याचे सूट सलवार घालून डान्स केला होता. आणि हा व्हिडीओ खूप प्रमाणात व्हायरल झाला होता. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी देखील या लहान मुलीची व्हिडिओ पाहून तिचे कौतुक केले होते. तेव्हापासुनच या गाण्याच्या चाहत्यांची संख्या खूपच वाढताना दिसली होती, परंतु खरी कमाल केली ती हिमांशी गोस्वामी हिनेच.


Leave A Reply

Your email address will not be published.