Thursday, January 15, 2026
Home भोजपूरी पुन्हा एकदा वादाच्या भाेवऱ्यात सापडली सपना चाैधरी, अभिनेत्रीवर भावाच्या पत्नीनेच केला गुन्हा दाखल

पुन्हा एकदा वादाच्या भाेवऱ्यात सापडली सपना चाैधरी, अभिनेत्रीवर भावाच्या पत्नीनेच केला गुन्हा दाखल

सपना चौधरी तिच्या डान्समुळे अनेकदा चर्चेत असते. अशात अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, परंतु यावेळी अभिनेत्री तिच्या डान्समुळे नाही तर एका वादामुळे चर्चेत आली आहे. सपनाबाबत पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. सपनाच्या वहिनीने पलवल पोलिस ठाण्यात डान्सरसह सासू नीलम आणि पती करण यांच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

करण चाैधरीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पलवल पोलिसांनी सपना चौधरी (sapna choudhary) हिची आई नीलम आणि भाऊ करण यांच्याविरुद्ध हुंडाबळी संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. सपनाच्या वहिनीने तिच्या कुटुंबीयांवर क्रेटा कारची मागणी, मारहाण आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ‘सपनाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याने तिचा छळ करणे, मारहाण करणे आणि लैंगिक अत्याचार करणे सुरू केले.’ सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पीडितेवर व्हायचा लैंगिक अत्याचार
सपनाच्या वहिनीने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, ‘मुलीच्या जन्मानंतर सासरच्या लोकांनी ‘छूछक समारंभात’ कारची मागणी करण्यास सुरुवात केली. मात्र, तिच्या वडिलांनी तिला तीन लाख रुपये रोख, काही सोने, चांदी आणि कपडे दिले. घरच्यांकडून अशी भेटवस्तू मिळाल्यानंतरही सासरच्या मंडळींनी नाराजी दाखवत तिला पुन्हा शिवीगाळ करत गाडीची मागणी करण्यास सुरुवात केली. तर, 6 मे 2020 रोजी तिच्या पतीने तिच्यावर अत्याचार केला आणि दारूच्या नशेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.’

या संपूर्ण प्रकरणाबाबत महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी सुशीला संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहेत. (
hariyanvi dancer sapna choudhary and his mother neelam and brother karan in legal trouble his sister in law fir registered under dowry violence)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
करण जोहरने केली त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा, हा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

जेव्हा रफी साहेबांच्या गळ्यातून गाणं गाताना आला होते रक्त, सतत १५ दिवस केला होता रियाज

हे देखील वाचा