Wednesday, July 3, 2024

फॅट शेमिंगवर मिस युनिव्हर्स हरनाज सिंधूने तिच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनने दिले ट्रोलर्सला सणसणीत उत्तर

मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या कलाकारांबद्दल नेहमीच लोकांमध्ये एक इमेज तयार असते. त्यांचा आवडता सेलिब्रिटी कसा असावा, तो कसा दिसावा आदी कलाकारांच्या अनेक गोष्टी प्रेक्षकांसाठी खूपच महत्वाच्या असतात. सामान्य लोकांची नजर इतकी तीक्ष्ण असते की की कलाकारांमध्ये झालेले छोटे छोटे बदल देखील ते सहज टिपतात. कलाकारांच्या या बदलांवरून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणवर ट्रोल देखील केले जाते. या ट्रोलिंगचा अनुभव मिस युनिव्हर्स २०२१ चा ताज जिंकणाऱ्या हरनाज सिंधूला देखील आला होता.

हरनाज सिंधूने नेहमीच तिच्या सौंदर्याने आणि तिच्या आकर्षक व्यक्तीमत्वाने संपूर्ण जनतेची मने जिंकली. ब्युटी विथ ब्रेन असणाऱ्या हरनाजने मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला आणि तिला अमाप लोकप्रियता मिळाली. हरनाजने तिच्या या विजयानंतर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली. मात्र नंतर तिच्या वजनात वाढ होत गेली आणि हेच लोकांना पाठवले गेले नाही. नेटकऱ्यांनी हरनाजला तिच्या वजनावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली. हरनाजने या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष केले आणि ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. मात्र हे उत्तर शाब्दिक नाही तर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमधून दिले.

मिस युनिव्हर्सचा ‘किताब जिंक्ल्यानांतर पहिल्यांदा जेव्हा हरनाज सिंधूने रॅम्प वॉक केला त्यानंतर तिच्या बदलेल्या लूकवरून आणि वाढलेल्या वजनावरून तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. मात्र तिला मिळालेल्या या फॅट शेमिंगला तिने सकारत्मक घेतले आणि यालाच ताकद बनवत स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्धार केला. ट्रोलिंगनंतर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हरनाजने सांगितले की, तिचे वजन सीलिएक नावाच्या आजारामुळे वाढले होते.

वजन वाढल्यानंतर हरनाजने ट्रान्सफॉर्मेशन करण्याचे ठरवले आणि सर्वांना सुखद धक्का दिला. हरनाजने वजन कमी करण्याचे आव्हान स्वीकारले आणि खूपच कमी काळात तिने तिचे वजन कमी करत नेटकऱ्यांना आणि ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा