लहानांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक सीरिज आल्या, पण सर्वाधिक कुठली सीरिज गाजली असेल, तर ती म्हणजे हॅरी पॉटरची. जगप्रसिद्ध लेखिका जेके रोलिंग यांच्या ७ पुस्तकांवर आधारित असलेल्या हॅरी पॉटरच्या ८ सिनेमांच्या सीरिजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. ज्याप्रकारे रोलिंग यांच्या हॅरी पॉटरच्या ७ पुस्तकांना अमाप यश मिळालं, त्याचप्रकारचं यश हॅरी पॉटर सिनेमांनाही मिळालं. या सीरिजमधील पात्रांचाही आपला वेगळाच चाहतावर्ग आहे. हॅरी पॉटरमधील कलाकार आता चांगलेच मोठे झाले आहेत, पण ते सध्या कसे दिसतात आणि काय करतात? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल ना? चला तर जाणून घेऊया हॅरी पॉटरमधील कलाकार सध्या करतात तरी काय?
हॅरी पॉटर
या सीरिजमध्ये हॅरी पॉटर हे पात्र अभिनेता डॅनियल रेडक्लिफने साकारले होते. त्याने साकारलेल्या पात्राला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. तो स्वत:मध्ये एक कमालीचा अभिनेता आहे. त्याने हॅरी पॉटरव्यतिरिक्त अनेक सिनेमात काम केलंय, पण तुम्ही कदाचित त्याला मोजक्याच २-३ सिनेमात पाहिलं असेल. मात्र, तुम्हाला त्याचे कोणते पात्र आवडले असेल, तर ते म्हणजे हॅरी पॉटर हेच. गोल चष्मा घालणारा, कपाळावर व्रण असलेल्या या मुलाने सर्वांच्याच मनात घर केलं होतं. हॅरी पॉटरचा शेवटचा सिनेमा २०११ साली आला होता. मात्र, आज हा कलाकार आहे तरी कुठे? काय करतोय? तर हॅरी पॉटरनंतर डॅनियलने जवळपास २० एक सिनेमात काम केलंय. ज्यात ‘हॉर्न्स’, ‘स्विस आर्मी मॅन’, यांसारखे बरेच. तो शेवटचा २०२० मध्ये आलेल्या ‘अनब्रेकेबल किम्मी श्मिट: किम्मी विरुद्ध रेव्हरंड’ या सिनेमात झळकला होता. डॅनियल थिएटरमध्येही सुपरऍक्टिव्ह आहे. जिथे इतर कलाकार सिनेमातून वेळ काढत थिएटर करत आहेत, तर दुसरीकडे डॅनियल थिएटरमधून वेळ काढत सिनेमात काम करत आहे. एकदा तर त्याने न्यूड प्लेमध्येही काम केलं होतं.
हर्माइनी ग्रेंजर
पुढील नाव आहे हर्माइनी ग्रेंजर. ती होती हॉगवर्ट्समधील सर्वात हुशार जादूगर. हे पात्र साकारलं होतं प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसननं. पूर्ण १० वर्षे हर्माइनीची भूमिका साकारल्यानंतर एमाने आपल्या शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला. यावरून कळतं की, इतकं यश मिळाल्यानंतरही एमा आपल्या शिक्षणाला किती महत्त्व देत होती, पण असं कधीच झालं नाही की, तिने सिनेमातून पूर्ण ब्रेकच घेतलाय. एमाने सिनेमा आणि शिक्षणात समतोल साधला. २०१४ साली तिनं इंग्रजी लिटरेचरमध्ये पदवी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मध्ये मध्ये ती, ‘द ब्लिंग रिंग’, ‘द सर्कल’ यांसारख्या सिनेमातही काम करत होती. सोबतच ती महिलांच्या समान हक्कांसाठीही आवाज उठवत होती. एमा ही फॅशन इंडस्ट्रीतीलही एक मोठे नाव आहे. ती २००५ सालच्या ‘टीन वोग’ मॅगझिनमध्ये झळकणारी सर्वात कमी वयाची महिला होती. एमाचा शेवटचा सिनेमा २०१९ साली रिलीझ झाला होता. तिच्या सिनेमाचं नाव होतं ‘लिटल वुमन.’ हा एक पीरियड ड्रामा सिनेमा होता.
रॉन वीज्ली
हॅरी पॉटर आणि हर्माइनी ग्रेंजरबद्दल तर आपण बोललोच. आता बारीये ती म्हणजे यांचा आवडता मित्र रॉन वीज्ली. घाबरणाऱ्या रॉनची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच रुपर ग्रिंट. रुपर्टने ‘हॅरी पॉटर’सीरिजच्या आठच्या आठ सिनेमात २०११ पर्यंत काम केले होते. त्यानंतर तो ‘क्रॉस ऑफ ऑनर’, ‘स्नॅच’ यांसारख्या सिनेमा आणि शोमध्ये झळकला होता. २०१२च्या ऑलिंपिकमध्येही रुपर्ट मशाल घेऊन धावला होता. तो सध्या ‘सर्वंट’ या टीव्ही सीरिजमध्ये दिसत आहे.
लॉर्ड वोल्डेमॉर्ट
राल्फ फेनेस, म्हणजे ‘शिंडलर्स लिस्ट’चा एमन गोथ. ‘लँड ऑफ द ब्लाईंड.’ जर अजूनही ओळखू शकला नसाल, तर आता आम्ही जी ओळख करून देणार आहोत, त्याने तुम्ही नक्कीच ओळखाल. राल्फ म्हणजेच हॅरी पॉटरच्या नाकी नऊ आणणारा नालकेस वोल्डेमॉर्ट. अकादमी पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या राल्फ फेनेस १९९१ सालापासून काम करत आहेत. हॅरी पॉटर सिनेमांनंतर राल्फ यांनी आपले अभिनय करिअर सुरूच ठेवले तसेच ‘स्काय फॉल’, ‘स्पेक्टर’ यांसारख्या अनेक हिट सिनेमात काम केलंय. ते २०२१ साली ‘द किंग्स मॅन’ सिनेमात झळकले होते. त्यांच्या खात्यात ‘द मेन्यू’, ‘द वंडरफूल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’, ‘फार्न्सवर्थ हाऊस’ आणि ‘ब्राईड रीविजिटेड’ यांसारखे बहुप्रतिक्षित सिनेमे आहेत. विशेष म्हणजे, राल्फ युनिसेफ युकेचे ब्रँड एंबेसेडर आहेत. ते भारतासोबतच अनेक देशात मानवी अधिकारांसाठी काम करत आहेत.
प्रिन्सिपल डंबलडोर
हॉगवर्ट्सचे प्रिन्सिपल, मोठी दाडी असणारे सर्वात मोठ्ठे जादूगर. हे पात्र दोन व्यक्तींनी साकारलं होतं. ‘हॅरी पॉटर’च्या पहिल्या दोन सिनेमात रिचर्ड हॅरिस डंबलडोरच्या भूमिकेत दिसले होते. रिचर्ड १९५९ पासून सिनेइंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांचा पहिला सिनेमा होता ‘अलाईव्ह अँड किकिंग.’ जेव्हा हॅरिस यांच्याकडे डंबलडोरची भूमिका आली, तेव्हा त्यांनी आपली बिघडत असलेल्या आजारामुळे रिजेक्ट केली होती. पण हॅरिस यांच्या नातीने त्यांना सांगितले की,
जर त्यांनी हॅरी पॉटरमध्ये काम केलं नाही, तर ती त्यांच्याशी बोलणार नाही. त्यांच्या नातीच्या हट्टापायी रिचर्ड यांनी ही भूमिका स्वीकारली होती. त्यानंतर दुसऱ्या हॅरी पॉटर सिनेमात शूटिंगच्या शेवटच्या दिवसात रिचर्ड यांची तब्येत जरा जास्तच बिघडली. २५ ऑक्टोबर, २००२ला रिचर्ड हॅरिस यांनी अखेरचा श्वास घेतला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रोमान्स एकासोबत अन् लग्न दुसऱ्यासोबत, ‘या’ कलाकारांना काळजावर दगड ठेवत संपवावे लागले नाते
जेव्हा मिथुनदा आणि श्रीदेवीच्या किसींग सीनमुळे झालेला मोठा राडा, अभिनेत्रीने थेट पत्रकारांपुढेच…
दोघं संगतीनं…! थेट बायकोला घेऊन सोशल मीडियावर हवा करणारे जोडपे, जगभरात गाजतंय यांचं नाव