Saturday, June 29, 2024

‘मुन्नी’ स्वत:लाच म्हणाली ‘फुलांपेक्षा सुंदर’, नेटकऱ्यांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील ‘मुन्नी’ म्हणजेच हर्षाली मल्होत्रावर प्रेक्षक आजही खूप प्रेम करतात. हर्षाली सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि दरदिवशी तिचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, हर्षाली मल्होत्राचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका डायलॉगवर अभिनय करताना दिसत आहे. हर्षालीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे आणि ते त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत.

या व्हिडिओमध्ये हर्षाली मल्होत्रा म्हणते, “तुम्हाला माहित आहे का? की काही लोक ना फुलापेक्षा सुंदर असतात. जसे की तुम्ही मलाच बघा आता.” हर्षाली मल्होत्राने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओवर कमेंट करत एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, “तुझी स्माईल खूप गोड आहे.” त्याचवेळी, दुसर्‍या युजरने लिहिले आहे की, “हा काय विनोद आहे. तू तर खरोखरच एखाद्या फुलापेक्षा सुंदर आहेस.” एका चाहत्याने लिहिले, “हर्षाली कॅटरिनासारखी आहे.” अशाप्रकारे हर्षालीच्या या व्हिडिओवर चाहते खूप प्रेम व्यक्त करत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, हर्षाली मल्होत्राने २०१५ मध्ये आलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामध्ये ‘मुन्नी’ची भूमिका साकारली होती, ज्यामुळे ती एका रात्रीत स्टार बनली. चित्रपटात हर्षालीचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला. तसेच सलमान खानसोबतची तिची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप पसंत पडली. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटानंतर हर्षाली अद्याप कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

विशेष म्हणजे, ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या शाहिदा पात्रासाठी सुमारे १००० मुलींनी ऑडिशन दिले होते, तर त्यामध्ये हर्षालीची निवड झाली होती. चित्रपट स्टार असण्याव्यतिरिक्त ती एक सोशल मीडिया स्टारदेखील बनली आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने समुद्रकिनारी केला ‘अब के बरस’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहून चाहतेही भलतेच खुश

-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच

-सनी लिओनीने चाहत्यांना दिले ‘हे’ खतरनाक चॅलेंज, भल्या- भल्यांना फुटेल घाम घाम

हे देखील वाचा