Monday, July 1, 2024

‘मास्क लावायचे ज्ञान देत होती, आता..’, हर्षाली मल्होत्राचे बीचवरील फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने ओळख मिळवणारी ‘मुन्नी’ अर्थातच, हर्षाली मल्होत्राने आपल्या गोड अंदाजाने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर होताच व्हायरल होऊ लागतात. त्याचवेळी तिने नुकताच शेअर केलेला फोटो चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे. या फोटोत हर्षाली खूपच गोंडस दिसत आहे. तसेच यात ती खूप रिलॅक्स आणि आनंदीही दिसत आहे.

या फोटोत आपण पाहू शकतो की, हर्षाली मल्होत्रा ​​बीचच्या कडेला झोक्यावर झोपलेली आहे. तिने लाल रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तसेच शॉर्ट्स आणि टाय हेअरमध्येही ती खूपच गोंडस दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “अस्वस्थता, चिंता, तणाव, या सर्व प्रकारची भीती भविष्याबद्दल जास्त विचार केल्यामुळे उद्भवते, ज्याबद्दल आत्ताच विचार करण्याची गरज नाही.”

हर्षालीची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्याच वेळी काही युजर्सने तिला ट्रोल करण्यास देखील सुरू केले आहे. एका सोशल मीडिया युजरने हर्षालीच्या पोस्टवर लिहिले की, “तू आधीच्या व्हिडिओमध्ये मास्क लावण्याचे ज्ञान देत होती, आता ते स्वतः लाव.”

यापूर्वीही हर्षाली मल्होत्राचा एक व्हिडिओ खूप पसंत केला गेला होता. या व्हिडिओमध्ये ती खिडकीच्या बाहेर डोकावताना दिसत आहे. तसेच, व्हिडिओमध्ये ती सुंदर हवामानाचा आनंद लुटताना दिसत होती. या व्हिडिओला आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हर्षाली मल्होत्राने चित्रपटांव्यतिरिक्त बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तिने ‘कुबूल है’ आणि ‘लौट आओ त्रिशा’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. इतकेच नव्हे तर करिश्मा कपूर आणि क्रिती सेनन यांच्यासह ती अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तूफानों से’ गाणं म्हणत कैलाश खेर, शिबानी कश्यप अन् सुदेश भोसले यांनी केला कोरोना योद्धांना सलाम

-‘जीना नहीं मुझे हैं मरना’, म्हणत छतावर केला कुणाल खेमूने डान्स, मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

 

हे देखील वाचा