Friday, July 5, 2024

‘बजरंगी भाईजान’ फेम ‘मुन्नी’ने ‘या’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; व्हिडिओतील क्यूट अंदाजावर चाहतेही फिदा

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली बाल कलाकार ‘मुन्नी’ म्हणजेच हर्षाली मल्होत्रा होय. हर्षाली आता मोठी झाली असून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सतत आपले फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या क्यूट लूकमुळे तिने सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. नुकताच हर्षालीने सोशल मीडियावर ‘गोरे गोरे मुखडे पे’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओमधील हर्षालीचा डान्स नेटकऱ्यांना खूपच आवडला असून व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.

सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटात सलमान खानसह सगळ्यात जास्त कौतुक झालं होतं, ते म्हणजे हर्षाली मल्होत्राचे. चित्रपटात मुक्या मुलीची भूमिका करणार्‍या हर्षालीने आपल्या क्यूट लूक आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटात बालकलाकार असलेली मून्नी म्हणजेच हर्षाली आता मोठी झाली असून सोशल मीडियावर सतत चर्चेत असते.

हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावरून डान्सचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. या पोस्टमधील हर्षालीचा सुंदर लूक आणि डान्स बघून चाहते तिच्या प्रेमात पडत आहेत. नुकताच हर्षालीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ‘गोरे गोरे मुखडे पे’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये हर्षाली खूपच क्यूट दिसत असून आपल्या बहारदार नृत्याने तिने चाहत्यांवर मोहिनी घातली आहे.

या व्हिडिओमध्ये हर्षालीने लेहंगा घातला असून त्यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. या व्हिडिओमधील हर्षालीचा डान्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून पुन्हा एकदा हर्षालीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

हर्षालीच्या या व्हिडिओला आतापर्यंत १ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हर्षालीबद्दल बोलायचं झालं, तर तिचा जन्म 3 जुलै, 2008 मध्ये मुंबईत झाला होता. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटातील तिने साकारलेली ‘मुन्नी’ प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटानंतर हर्षाली अर्जुन रामपाल सोबत ‘नास्तिक’ चित्रपटात दिसून आली होती. इतक्या कमी वयात यशाच्या शिखरावर पोहोचलेली हर्षाली सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून तिचे इंस्टाग्रामवर तब्बल 1.5 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Video: पहिल्यांदाच सासरी पोहोचली अभिनेत्री देबीना बॅनर्जी, सासरच्यांकडून जंगी स्वागत

-क्या बात है! सुनील शेट्टीचा मुलगा अहानच्या डेब्यू सिनेमाचा टिझर रिलीझ; तारा सुतारियासोबत करणार रोमान्स

-काय सांगता! ‘या’ भीतीमुळे भोजपुरी सुपरस्टार निरहुआ कधीच गेला नाही त्याच्या सासरवाडीत; स्वत:च केला खुलासा

हे देखील वाचा