हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीच्या (Sapana Choudhary) अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सपना चौधरीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने सपनाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणी आता सपना स्वतः कोर्टात जाणार आहे. नवीन माहितीनुसार सपना चौधरी फसवणूक प्रकरणी आज न्यायालयात आत्मसमर्पण करणार आहे. यासाठी सपना चौधरीही लखनौला पोहोचली आहे. न्यायालयाने सपनाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, त्यानंतर तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. पण आता सपना स्वतः शरण जाणार आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सपना चौधरी ही हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका आहे. सध्या ती एका जुन्या वादामुळे चांगलीच अडचणीत अडकली आहे. फसवणूक प्रकरणी सपना चौधरी आणि इतरांविरुद्ध लखनऊच्या आशियाना पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पैसे घेऊनही ती डान्स शोमध्ये पोहोचली नाही, असा आरोप सपना चौधरीवर आहे. या प्रकरणी सपनाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण 2018 सालचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 3 ते 10 या वेळेत स्मृती उपवनमध्ये सपना चौधरी आणि इतरांचा कार्यक्रम होता, ज्यासाठी प्रति व्यक्ती 300 रुपये दराने ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट विकले गेले.
हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो लोक तिकीट घेऊन उपस्थित होते, मात्र सपना चौधरी रात्री 10 वाजेपर्यंत आल्या नाहीत. यावर प्रेक्षकांनी एकच गोंधळ घातला. त्यानंतर तिकीटधारकांचे पैसेही परत करण्यात आले नाहीत. 4 सप्टेंबर 2021 रोजी न्यायालयाने या प्रकरणी सपना चौधरीचा अर्ज फेटाळला. आता याप्रकरणी सपना आज न्यायालयात हजर राहणार आहे.
हेही वाचा – अर्शदीपच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आयुषमान खुराना; म्हणाला,’देवासाठीतरी…’
धक्कादायक! सोनालीच्या हत्येनंतर मुलगी यशोधराच्या जीवाला धोका? कुटुबीयांकडून सुरक्षेची मागणी
अरेरे! तारक मेहता कार्यक्रम सोडल्यानंतर अशी झाली सोनूची अवस्था, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क