Wednesday, February 5, 2025
Home अन्य आहा कडकच ना! सपना चौधरीचे ‘पतली कमर’ गाणे रिलीझ; मिळाले १० लाखांपेक्षाही अधिक हिट्स

आहा कडकच ना! सपना चौधरीचे ‘पतली कमर’ गाणे रिलीझ; मिळाले १० लाखांपेक्षाही अधिक हिट्स

देशभरात आपल्या डान्सने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण करणे, सर्वांनाच जमते असे नाही. त्यातील काही कलाकार असे असतात, जे आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करतात आणि प्रेक्षकांची ‘वाहवा’ मिळवतात. यापैकीच एक म्हणजे ‘हरियाणवी डान्सिंग क्वीन’ सपना चौधरी होय. सपना आपल्या डान्सने आज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिचे नवीन गाणे इंटरनेटवर ट्रेंड करत आहे.

शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) सपना चौधरीचे ‘पतली कमर’ हे नवीन गाणे नव हरियाणवी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. अवघ्या दोन दिवसात या गाण्याने लाखो व्ह्यूज मिळवले आहेत. या व्हिडिओत पुन्हा एकदा सपनाचा जुन्या आणि चर्चित देसी हरियाणवी अंदाजात दिसत आहे. या व्हिडिओत तिच्यासोबत हरियाणवी अभिनेता विवेक दहिया दिसत आहे. या गाण्याचे बॅकग्राऊंड गावावर आधारित आहे. या गाण्यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (Haryanvi Queen Sapna Choudhary New Song Patli Kamar Released)

सोशल मीडियावर व्हायरल होतंय गाणं
सपना चौधरीचे हे गाणे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सर्वप्रथम या गाण्याचा टिझर सपनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या टिझरसोबतच सपनाने कॅप्शनमध्ये या गाण्याच्या प्रदर्शनाची तारिखही सांगितली होती. यानंतर हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांकडून या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

गाण्याला मिळाले तब्बल १० लाख व्ह्यूज
सपनाचे हे गाणे यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याला आतापर्यंत तब्बल १० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ५ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्सचाही पाऊस पडला आहे.

हे गाणे यूके हरियाणवी या गायकाने गायले आहे. या गाण्याला जीआर यांनी संगीत दिले आहे. त्याचबरोबर या गाण्याचे दिग्दर्शन पवन गिल यांनी केले आहे.

सपनाबद्दल बोलायचं झालं, तर तिने सन २०१७ मध्ये ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वात सहभाग घेतला होता. तिने ‘नानू की जानू’, ‘वीरे की वेडिंग’, ‘जर्नी ऑफ भाँगओवर’, ‘एक तू एक मै’, ‘सपना चौधरी सॉन्ग लिस्ट’, ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ अशा चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Video: सारा अली खान कारमध्ये बसताच गरजू महिलेने मागितली मदत, पाहा काय केलं अभिनेत्रीने

-‘अधूरा’चा फर्स्ट लूक रिलीझ: शेवटचे एकत्र दिसणार ‘सिडनाझ’, चाहत्यांना अनावर झाल्या भावना

-‘आदिपुरुष’ चित्रपटाचे शूटिंग पुर्ण, दिग्दर्शकाचे आभार मानत क्रिती सेननने शेअर केली खास पोस्ट

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा