Wednesday, July 3, 2024

‘५२ गज का दामन’ची गायिका रेणुका पंवारने केला बी प्राकच्या ‘या’ गाण्यावरील व्हिडिओ शेअर, बाल्कनीतच लावले जोरदार ठुमके

हरियाणवी गायिका रेणुका पंवारने गायलेले ’52 गज का दामण’ हे गाणे सुपरहिट ठरले. याव्यतिरिक्त तिची इतर गाणीही सगळीकडे धमाल करत आहेत. रेणुका पंवार ही संगीत क्षेत्रात एक वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे. केवळ गाणे नाही, तर डान्समध्ये देखील तिने एक वेगळीच उंची गाठली आहे. याचा प्रत्यय तिच्या डान्स व्हिडिओमुळे वेळोवेळी येत असतो. तिचा नुकताच एक डान्स व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती बी. प्राकच्या ‘बारिश की जाये’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

रेणुका पंवारने तिचा हा डान्स व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेणुका बाल्कनीमध्ये उभी आहे आणि हावभाव करत ती डान्स करत आहे. तिने शेअर केलेल्या या डान्स व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया येताना दिसत आहे. ‘बारिश की जाये’ हे गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर चित्रीत केले आहे.

रेणुका पंवार ही हरियाणातील एक नावाजलेली गायिका आहे. ती एका नंतर एक अशी अनेक सुपरहिट गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. तिचे ‘हरियाणवी बिट’ आणि ‘चटक मटक’ हे गाणे देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहे. तिच्या या दोन गाण्यांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले.

‘चटक मटक’ या गाण्यात तिने सपना चौधरीसोबत दमदार डान्स देखील केला आहे. त्याच्या जोडीला सगळ्यांनी पसंती दर्शवली. तसेच हे गाणे सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाले. तिचे सगळ्यात लोकप्रिय गाणे म्हणजे ’52 गज का दामण’ या गाण्याने तर सर्व रेकॉर्डस तोडले आहे. या गाण्याला 81 कोटींपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फॅन असावी तर अशी! लहानग्या चाहतीकडून राखी सावंतला १.५ लाख रुपयांचं गिफ्ट; अभिनेत्रीही झाली भलतीच खुश

-घरात शिरलेल्या गोरिलाला बाहेर काढण्याऐवजी श्रद्धा कपूरने लावले त्याच्यासोबत जोरदार ठुमके, पाहा मजेशीर व्हिडिओ

-व्हिडिओ: दिया मिर्झाने केला सावत्र मुलीचा वाढदिवस साजरा, वैभव रेखीच्या एक्स वाईफनेही लावली हजेरी

हे देखील वाचा