Wednesday, June 26, 2024

कपूर बहिणींनी शेअर केला आजी- आजोबांचा फोटो; पाहून तुम्हीही म्हणाल ‘एकच नंबर’

भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘शो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांची आजही कोट्यवधी चाहते त्यांच्या अभिनय आणि दिग्दर्शनासाठी आठवण काढत असतात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. अशामध्ये करीना कपूर आणि करिश्मा कपूर नेहमीच आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो शेअर करत असतात. यादरम्यान या अभिनेत्रींनी आपल्या चाहत्यांसाठी आपले आजोबा राज कपूर यांचा एक खास फोटो शेअर केला आहे.

करिश्मा कपूर आणि करीना कपूरने नुकतेच आपले आजी- आजोबांचा म्हणजेच राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो इतका अप्रतिम आहे की, यावरून नजर हटवणेही कठीण होईल.

फोटोत दिसला राज कपूर यांचा खास अंदाज
करीना आणि करिश्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये राज कपूर हे सूटमध्ये दिसत आहेत. यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असून ते खूपच आनंदी दिसत आहेत. त्यांनी आपल्या हातात एक पुस्तकही पकडले आहे, तर त्यांची पत्नी कृष्णा  राज कपूर यांच्याबाबत बोलायचं झालं, तर त्या एका प्लेन साडीत दिसत आहेत. त्यांनी आपला पदर डोक्यावर घेतलेला आहे.

राज कपूर यांचा हा फोटो पहिल्यांदाच पाहून चाहतेही पुरते वेडे झाले आहेत. चाहत्यांना राज कपूर यांचा हा फोटो खूपच आवडला आहे. हा फोटो करीना आणि करिश्मा दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आजोबा आणि आजी.”

राज कपूर यांचे कुटुंब
राज कपूर यांना पाच अपत्य आहेत. त्यात तीन मुले आहेत. त्यामध्ये रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांचा समावेश आहे. यांपैकी आता फक्त रणधीर कपूर हयात आहेत. याव्यतिरिक्त त्यांना दोन मुली आहेत. त्यात रीमा कपूर आणि रितू नंदा यांचा समावेश आहे. मात्र, रितू नंदा आता या जगात नाहीत.

https://www.instagram.com/p/CLEW4PoJyu4/?utm_source=ig_web_copy_link

करिश्मा आणि करीना या राज कपूर यांचा मोठा मुलगा रणधीर कपूर यांच्या मुली आहेत. त्यांच्या दोन्हीही मुलींना बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. असे म्हटले जाते की, करीना  आणि करिश्माव्यतिरिक्त कपूर कुटुंबातील इतर मुलींनी सिनेमात काम केले नाही. इतकेच नव्हे, तर रणबीर कपूरची बहीण रिद्धीमा कपूर सुंदर असूनही तिने सिनेमात काम केले नाही.

https://www.instagram.com/p/CKHLOJnrE00/?utm_source=ig_web_copy_link

राज कपूर हे पृथ्वीराज कपूर यांचे सुपुत्र होते. पृथ्वीराज हे चित्रपटातील एक प्रसिद्ध चेहरा होते. राज कपूर नेहमीच हिंदी सिनेमातील ‘शो मॅन’ म्हणून ओळखले गेले. राज कपूर यांना तब्बल ११ वेळा फिल्मफेअर पुरस्कार आणि ३ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने समुद्रकिनारी केला ‘अब के बरस’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहून चाहतेही भलतेच खुश

-‘मुन्नी’ स्वत:लाच म्हणाली ‘फुलांपेक्षा सुंदर’, नेटकऱ्यांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच

हे देखील वाचा