Sunday, May 12, 2024

पुलकित सम्राटच्या ‘या’ गुणावर फिदा झाली क्रिती खरबंदा; म्हणाली, ‘प्रत्येक जोडीदारात पाहिजे…’

अभिनेत्री क्रिती खरबंदा यापूर्वी तिच्या ‘१४ फेरे’ या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. तिने अलीकडेच अभिनय क्षेत्रातील आपली बारा वर्षे पूर्ण केली आहेत. एका मुलाखती दरम्यान क्रितीने तिचा चित्रपट प्रवास, नकार, कौटुंबिक आणि पहिल्या कमाईबद्दल सांगितले आहे. त्याचबरोबर ती तिचा जोडीदार पुलकित सम्राटसोबतच्या नातेसंबंधाच्या सल्ल्याबद्दल आपले मत व्यक्त केले.

क्रिती म्हणाली की, ती एक स्त्री असल्याने आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांविषयी मोकळेपणाने बोलते. अलीकडेच ‘१४ फेरे’ चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये १२ वर्षे पूर्ण केलीत. या काळातील तुमच्यासाठी आतापर्यंतचे सर्वात संस्मरणीय पात्र कोणते होते? त्यावर उत्तर देत म्हणाली की, “आरती शुक्ला हे पात्र ‘शादी में जरूर आना’ या चित्रपटातील जे माझ्यासाठी फक्त एक आव्हान नव्हते, तर संपूर्ण चित्रपट यशस्वी करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. हिंदी चित्रपटात मी पहिल्यांदाच असे पात्र साकारले. हे पात्र माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. मी खऱ्या आयुष्यात जितकी बबली आहे, तितकी आरती माझ्यापेक्षा वेगळी आहे. तो चित्रपट माझी सर्वात मोठी ओळख बनला आहे. ‘तैश’ मध्ये फक्त २० मिनिटांसाठी मला खूप प्रशंसा मिळाली, म्हणून माझ्यासाठी ही एक मोठी गोष्ट होती. ‘१४ फेरे’च्या अदितीची सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे तिने कधीही आदर्श बनण्याचा प्रयत्न केला नाही.” (“He lets me stay the way I am,” the actress commented on her husband)

‘चित्रपट न मिळाल्यामुळे रडायची’
तुम्हाला कधी अभिनेत्री म्हणून नाकारण्यात आले आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “हो अनेक वेळा. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी ऑडिशन देता आणि प्रत्येक गोष्ट ठरवली जाते, पण नंतर काही कारणांमुळे तुम्हाला तो चित्रपट किंवा प्रोजेक्ट मिळत नाही. माझ्यासोबत अनेक वेळा असे झाले आहे की, जर काही कारणास्तव मला चित्रपट मिळाला नाही, तर तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नाही. चित्रपट न मिळाल्यामुळे मी खूप रडायची, पण मला वेळोवेळी समजले की जेव्हा दीड वर्षानंतर तो चित्रपट येतो आणि जेव्हा मला तो न मिळण्याचे कारण समजते, तेव्हा मी वर बघून देवाचे आभार मानते. मला कोणाचाही पाठिंबा नाही. मी या क्षेत्रात माझ्या कुटुंबाची पहिली पिढी आहे, म्हणून मला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. मी स्वतःचा आधार बनून मी खूप आनंदी आहे.”

‘फोन वापरायचे तुझे वय नाही’
तुमचे पहिले उत्पन्न किती आणि किती होते? असा प्रश्न विचारला असता, ती म्हणाली की, “मला आठवत असलेली पहिली कमाई जाहिरात चित्रपटासाठी १२,००० रुपये होती. त्यावेळी ही रक्कम माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. मला माझ्यासाठी फोन घ्यायचा होता, तेव्हा मी बारावीत होते. माझ्या सर्व मित्रांकडे फोन होते, जे त्यांना ९ वी आणि १० वी मध्ये मिळाले होते. मी माझ्या पालकांना सांगितले की, मला फोन हवा आहे, प्रत्येकाकडे आहे. त्यांनी मला सांगितले की, फोन वापरायचे हे तुझे वय नाही. तू १२ वी नंतर घे. माझ्या पहिल्या कमाईमुळे मी पुन्हा माझ्यासाठी आणि माझ्या वडिलांसाठी २ फोन घेतले. फोन घेऊन, मी माझ्या वडिलांना विचारले की, मी यामुळे कशी काय बिघडेल? मी तुमची मुलगी आहे.”

‘मुलगा आणि मुलीतील फरक समजलाच नाही’
एक महिला म्हणून तुमच्यासाठी सर्वात अभिमानास्पद आणि नम्र क्षण कोणता होता?, याबद्दल ती म्हणाली की, “मी सुदैवाने खूप वेगळ्या पद्धतीने वाढलो आहे. मला मुलगा आणि मुलगी यातील फरक कधीच समजलाच नाही. माझ्या आई- वडिलांनी मला कधीच सांगितले नाही की तू मुलगी आहेस, असे कपडे घालू नकोस तसे कपडे घालू नकोस. हीनता ही माझ्यासाठी अशी एक गोष्ट आहे की, जी करण्यास समोरचा व्यक्ती तुम्हाला भाग पाडू शकत नाही. जर एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल, तर तो अत्याचार करणारा व्यक्ती आणि तो पाहणारा व्यक्ती सर्वात मोठा दोषी असतो. तुम्हाला तेव्हाच अपमानित वाटू शकते, जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला तो अधिकार देता. देव न करो आणि माझ्यासोबत असे काही अघटीत घडले तर माझे वडील येऊन माझ्यासमोर उभे राहतील. जेव्हा नवरा बायकोचा घटस्फोट होतो, तेव्हा लोक म्हणतात की, तिचा नवरा तिला सोडून गेला. जसे हा अधिकार फक्त पुरुषांना आहे. माझा सर्वांत अभिमानाचा क्षण हा आहे की, मी सर्वांना सांगितले की, मी एक मुलगी असूनही काय काय करू शकतो? जेव्हा लोक माझ्या वडिलांना लोक जेव्हा म्हणतात की, तुमची मुलगी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. काय माहिती तिचा तिथे काय सीन आहे? पण माझा जन्म अशा कुटुंबात होणं आणि माझे पालक माझ्या स्वप्नांना प्रोत्साहन देणे ही माझ्यासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट आहे.”

भौतिक गोष्टींवर नाही राहत अवलंबून
भौतिक गोष्टी तुला किती आनंद देतात? या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली की, “खरे सांगायचे, तर मी मुळीच भौतिक गोष्टींवर अवलंबून नाही. आज मी प्रत्येक गोष्ट घेऊ शकते, पण मला साधे जीवन हवे आहे. मी क्रेटामध्ये प्रवास करते, कारण ते खूप आरामदायक आहे. असे नाही मी रेंज रोव्हर खरेदी करू शकत नाही. मी महागडे शूज, कार किंवा बॅग खरेदी करत नाही. माझी सर्वात मोठी इच्छा हीच आहे की, माझे आई- वडील आनंदी राहावेत आणि त्यांचे भविष्य सुरक्षित असावे. घर हे माणसांनी बनतात. मी एक मध्यमवर्गीय घरातील मुलगी आहे. जिथे माझे वडील म्हणतात की, प्रेम हे पैशापेक्षा मोठे आहे. माझ्या आयुष्यात मला खूप प्रेम मिळाले आहे, म्हणून मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे.”

ती पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही, की…
महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणत्या मुद्द्यांवर काम केले पाहिजे? या प्रश्नावर ती म्हणाली, “मला वाटते की, लहानपणापासून मुलीला शिक्षण किंवा पात्रता समजावून सांगणे पुरेसे नाही. तुम्हाला मुलीला घरून आत्मविश्वास द्यावा लागेल. जर तुम्ही तिला असे सांगत आहात की, तू एक मुलगी आहेस. हा पुरुषप्रधान समाज जो तुम्हाला शिकवत आहे की, तुम्ही एक स्त्री आहात आणि तुम्ही खाली राहायला हवे, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. ती पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही की, ती सुद्धा स्वतःच्या मार्गाने उडू शकते. या गोष्टीची सुरुवात मुलीच्या घरापासून होते. तुम्ही शाळेत जाण्यापूर्वी ५ वर्षे घरी राहा आणि नंतर जर तुमचे वडील तुमच्या आईशी आदराने वागले, तर तिला समजेल की तिलाही आदर मिळू शकतो. जर वडिलांनी असभ्य वर्तन केले, तर ती कधीही स्वीकारणार नाही की, तिलाही या समाजात आदर मिळू शकतो. तिला ही गोष्ट सामान्य वाटेल.”

जोडीदार पुलकित सम्राटबाबत वक्तव्य
तुमचा जोडीदार पुलकित सम्राट तुम्हाला कसा पूरक आहे? या प्रश्नावर ती म्हणाली की, “मी जशी आहे, तसाच तो मला राहू देतो. त्याने कधीही मला बदलण्याचा प्रयत्न केला नाही आणि तो कधी करणारही नाही. त्याने मला जसे आहे तसे स्वीकारले आहे. आपल्या जोडीदारामध्ये हा गुण असणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न का करता? आम्ही एकमेकांसमोर खूप खरे आहोत. आपल्याकडे खूप साधे जीवन आहे.”

क्रिती खरबंदाने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यात, ‘शादी में जरूर आना’, ‘हाऊसफुल ४’, ‘पागलपंती’, ‘राज रिबूट’, ‘ब्रूस ली’, ‘गुगली’, ‘चेहरे’ यांसारख्या हिंदी आणि दाक्षिणात्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात

-तब्बल ३६ वर्षांपूर्वी ‘या’ जाहिरातीत दिसला होता ‘भाईजान’; हँडसम लूक पाहून चाहते नव्याने पडतायेत प्रेमात

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

हे देखील वाचा