Tuesday, July 9, 2024

मनोज वाजपेयींच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, म्हणाले, ‘मृत्यू हेच शेवटचं सत्य’

अनेक बाॅलिवूड कलाकार त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत येत असतात, तर काही कलाकार स्वत:च्या कुटुंबाविषयी माहिती देत असल्यामुळे चर्चेत येतात. कलाकार त्यांच्या कुटुंबातील सुख दुःखाचे क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. बाॅलिवूड अभिनेता मनोज वाजपेयींच्या वडिलांची प्रकृती खालावली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. मनोज त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. तसेच त्यांनी वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. मनोज यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला आहे.

मनोज वाजपेयी काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले की, “माझे वडील आता वृद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावणे साहजिकच आहे. ते एक दिवस तंदुरुस्त असतात, तर दुसर्‍या दिवशी त्यांची प्रकृती खालावलेली असते.” ते बोलताना पुढे म्हणाले की, “आम्ही फक्त वाट पाहू शकतो. परंतु मृत्यू हेच खरे अंतिम सत्य आहे. बाकी सर्व काही अप्रासंगिक आहे.”

यापूर्वी मनोज वाजपेयी यांच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली होती, तेव्हा ते तात्काळ मुंबईहून बिहारमधील बेतियाला पोहोचले होते. मनोज वाजपेयी हे आई- वडिलांचे प्रचंड लाडके आहेत. बराच संघर्ष करुन त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “जेष्ट अभिनेते मनोज कुमार यांचे नाव माझ्या वडिलांना खूप आवडते. त्यामुळे त्यांनी माझे नाव मनोज ठेवले.”

मनोज यांनी वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करताना लिहिले होते की, “माझे वडील नाॅनव्हेज अप्रतिम बनवतात.”

मनोज यांच्याविषयी बोलायच झाले, तर काही दिवसांपूर्वी मनोज यांनी कमाल राशिद खानच्या विरोधात इंदौर येथील एका न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यामुळे मनोज चर्चेत आले होते.  त्यांनी बाॅलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘द फॅमिली मॅन २’ या वेबसीरिजमध्ये ते शेवटचे दिसले होते. मनोज यांनी इंडस्ट्रीत प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राकेश मिश्राचे ‘हे’ गाणे रिलीझ; सोमेया पांडेसोबतच्या केमिस्ट्रीला मिळतेय चाहत्यांची पसंती

-राखी सावंतचा AAP नेते राघव चड्ढांना इशारा; म्हणाली, ‘माझ्या नावापासून दूर राहा, नाहीतर त्याचा…’

-‘विश्वातील सर्वात सुंदर मुलगी’, राजेश्वरी खरातच्या ग्लॅमरस अंदाजावर होतोय कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा