Friday, July 5, 2024

‘ओव्हर ऍक्टिंगचे ५० रूपये कट करा’, लस टोचवताना मराठी अभिनेत्रीची नौटंकी पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

देशभरात सर्वत्र कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. सध्या १८ वर्षांच्या वरील सर्वांसाठी कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे. सर्व सामान्यांप्रमाणे अभिनय क्षेत्रातील बरेच कलाकारही लस घेताना दिसले आहेत. त्यांचे लस घेतानाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सोबतच त्यांची इंजेक्शन घेतानाची नौटंकीही पाहायला मिळत आहेत. सुरूवातीला हे सर्व पसंत केले जात होते. मात्र, आता कलाकारांची नौटंकी जोरदार ट्रोल होऊ लागली आहे.

‘बिग बॉस’ मराठीमध्ये झळकलेली अभिनेत्री हिना पांचाळ, तिच्या बोल्डनेसने सतत चाहत्यांचे लक्ष वेधत असते. आपले फोटो व व्हिडिओ शेअर करून, ती सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चेचा विषय बनते. मात्र, आता ती चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे. हिनाने नुकताच तिचा लस टोचवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती इंजेक्शन घेताना बरेच नखरे करताना दिसली. तिच्याकडे पाहून, इंजेक्शन घेताना तिला किती त्रास झाला असेल आणि किती नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

अभिनेत्रीची ही नौटंकी पाहून नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत. व्हिडिओखाली कमेंट करत एका युजरने लिहिले, “ओव्हर ऍक्टिंग की दुकान,” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “ओव्हर ऍक्टिंगचे ५० रूपये कट करा.” या कठीण काळात जिथे सर्व सामान्यांना लस मिळत नाहीये, तिथे कलाकारांचे नखरे पाहून संताप व्यक्त केला जात आहे.

अलिकडेच अभिनेत्री आशा नेगीने अशा कलाकारांना चांगलेच सुनावले होते. एक पोस्ट शेअर करत तिने लिहिले होते की, “जे ऍक्टर आपला लसीकरणाचा व्हिडिओ अपलोड करत आहेत त्यांच्यासाठी… जागृकतेसाठी ठीक आहे, पण कृपया इतकी ओव्हर ऍक्टिंग करू नका. खूप त्रासदायक वाटतं ते.” तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “आणि व्हिडिओग्राफर स्वत: घेऊन जाता की रूग्णालयाकडून पुरवला जातो.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आयुष्यात मित्र कमी आणि ट्रोलर्सच जास्त भरले आहेत’, म्हणत शालूची आपल्याच फोटोवर कमेंट

-ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर

-‘या गरीब मुलासोबत काय करतेय?’ बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल

हे देखील वाचा