बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींना आपण त्यांच्या अभिनयासाठी ओळखतोच, पण अभिनयाव्यतिरिक्तही त्या आपल्या डान्स कौशल्यासाठीही प्रसिद्ध आहेत. तसं पाहिलं, तर अनेक अभिनेत्री पडद्यावर थिरकताना दिसतात, परंतु अभिनेत्रीमध्ये चाहत्यांचे मन जिंकण्याची कला फार कमीच पाहायला मिळते. आज या लेखात आपण त्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी आपल्या अभिनयामुळेच नाही, तर डान्सनेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. यासोबतच डान्सिंग डीवा म्हणूनही स्वत: ची ओळख निर्माण केली आहे.
हेलन
भारतीय चित्रपटातील सगळ्यात हुशार नृत्यांगनामध्ये हेलन यांच्या नावाचा समावेश होतो. लहानपण अतिशय कठीण परिस्थितीतून गेल्यावर हेलन यांनी असे नाव कमवून दाखवले की, आज सगळ्यांनाच त्यांचा अभिमान आहे. उत्तम अभिनेत्री हेलन या अभिनयापेक्षा त्यांच्या नृत्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. ७० च्या दशकात हेलन यांनी एक आयटम डान्स केले, जे इतर अभिनेत्रींसाठी आजही एक आव्हान आहे. ‘पिया तू अब तो आ जा’, ‘आ जाने जा’ अशी बरीच अप्रतिम गाणी आहेत ज्यात हेलन यांनी जबरदस्त डान्स केला आहे.
वैजयंतीमाला
वयाच्या १६ व्या वर्षांपासून त्यांनी भरतनाट्ट्यम असो की, कर्नाटक संगीत या दोन्हीत त्यांनी यश प्राप्त केले होते. मग पुढे जाऊन त्या पहिल्या महिला प्रसिद्ध अभिनेत्री झाल्या. ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या चमकदार नृत्यासाठी आजही लक्षात आहेत. ‘नील गगन की छाओ में’, ‘कैसे समझाऊ’ अशा गाण्यांवर त्यांनी असे नृत्य सादर केले, जे आजपर्यंत कोणीही विसरलेले नाही.
श्रीदेवी
दिवंगत अभिनेत्री यांनी त्यांचा अभिनय, मादक डोळे, मोहक सौंदर्य आणि या सर्व गोष्टींमुळे चाहत्यांना वेड लावले होते. त्याचबरोबर त्याच्या नृत्याने सर्वजण त्यांचे चाहते होते. ‘मोरनी बागा में बोली आधी रात को’, ‘हवा हवाई’ अशा काही प्रसिद्ध गाण्यात श्रीदेवी यांनी कमालीचे नृत्य केले होते.
मीनाक्षी शेषाद्री
दामिनी चित्रपटातल्या प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी यांनी माजी मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले होते. त्यांच्या चित्रपटांमधील अभिनय केवळ आवडला नाही, तर त्यांचे नृत्य कौशल्यही अप्रतिम होते. मीनाक्षी यांनी भरतनाट्यम, कुची पुडी, कथ्थक आणि ओडिसी या विषयांचे प्रशिक्षण घेतले होते. दामिनी चित्रपटात त्यांच्या ‘बिन साजन झूला झूलू’ नृत्याला खूपच पसंती मिळाली होती.
माधुरी दीक्षित
‘धकधक गर्ल’, ‘मोहिनी’ म्हंटलं की समोर नाव येते ते म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच प्रचंड कमालीची नृत्यांगना माधुरी दीक्षित होय. अभिनयाच्या बाबतीत माधुरी सुप्रसिद्ध आहेच, त्याचबरोबर तिचे नृत्यही खूप कमालीचे आहे. ‘एक दो तीन’, ‘दीदी तेरा देवर दीवाना’, ‘मेरा पिया घर आया’ आणि अशी भरपूर गाणी आहेत की, माधुरी यांनी ज्यांच्यावर जबरदस्त नृत्य केले आहे.
कॅटरिना कैफ
बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’ कॅटरिना कैफदेखील नृत्याच्या बाबतीत एकापेक्षा एक अभिनेत्रींशी स्पर्धा करते. जेव्हा कॅटरिना नाचते, तेव्हा ती त्यात जीव ओतून नाचते. ‘शीला की जवानी’, ‘चिकनी चमेली’ अशी काही गाणी आहेत ज्यात कॅटरिनाच्या चमकदार नृत्यांची अदा बघायला मिळते.
ऐश्वर्या राय बच्चन
माजी मिस वर्ल्ड आणि सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या देखील एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिने अनेकदा आपल्या नृत्याने पडद्यावर चाहत्यांना भुरळ घातली आहे. ऐश्वर्याने ‘डोला रे डोला’, ‘कजरारे’ यांसारख्या अनेक गाण्यांवर जबरदस्त नृत्य केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-