Monday, July 1, 2024

‘सोनू के टीटू की स्वीटी’ मधली ‘ही’ अभिनेत्री तिच्या हॉटनेसने लावत आहे चाहत्यांना वेड, एकदा तुम्हीही पाहून घ्या तिचे घायाळ करणारे फोटो

‘सोनू के टीटू की स्वीटी’ चित्रपटातील ‘बम डिग्गी डिग्गी’ मधील अभिनेत्री साक्षी मलिकच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. खास गोष्ट म्हणजे गाणे हिट झाल्यानंतरही साक्षी कोणत्याच चित्रपटात किंवा गाण्यात दिसली नाही. पण ही अभिनेत्री सोशल मीडियावर मात्र खूप अ‍ॅक्टिव असते. साक्षी मलिकचा मोहक लूक नेहमी चाहत्यांना वेड लावत असतो. दिवसेंदिवस ती सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत राहते. साक्षीने पुन्हा एकदा तिचे हॉट फोटो चाहत्यांसमोर सादर केले आहेत.

साक्षीची स्टाईल पाहता असे दिसून येते की ती बॉलिवूडमधील इतर अभिनेत्र्यांना चांगलीच टक्कर देऊ शकते. साक्षीच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर तिचे अनेक हॉट फोटो त्यात दिसतील. प्रत्येक फोटोमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.

साक्षीने शेअर केला बिकिनीमधील फोटो:
नुकतेच, अभिनेत्री साक्षी मलिकने तिचा बिकिनी फोटो शेअर केला आहे. तिने बिकिनीमध्ये तीन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी पहिल्या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाची बिकिनी घालून बीचवर उभी असलेली दिसत आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि आकर्षक दिसली आहे.

 

याशिवाय साक्षीने आणखी एक फोटो शेअर केला आहे. यात देखील ती बिकीनीमध्ये दिसली आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री पूलमध्ये उभी असून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे. यानंतर अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती डिनर एन्जॉय करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले आहे की, ‘मी मालदीवला जावे की युरोप पुन्हा उघडण्याची प्रतीक्षा करावी??’

एका पंजाबी अल्बममध्ये दिसली होती साक्षी:
बीटेक (B.Tech) केलेल्या साक्षीने ‘फ्रेशलूक’, ‘पीसी ज्वेलर्स’, ‘नायका’, ‘फेस कॅनडा’ सारख्या ब्रँड्ससोबत काम केले आहे. इतकेच नव्हे तर या अभिनेत्रीने बर्‍याच पंजाबी अल्बममध्ये देखील काम केले आहे. साक्षी इंस्टाग्रामवरही बरीच लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 5.9 दशलक्षाहूनही जास्त फॉलोअर्स आहेत.

साक्षी मलिकचा जन्म उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे झाला होता. साक्षीने दिल्लीमध्ये बीटेक (B.Tech) ची पदवी मिळवली. तिच्या कॉलेजच्या दिवसांत ती बर्‍याचदा कार्यक्रम आणि फॅशन शोमध्ये आघाडीवर असायची. पदवीनंतर ती मुंबईत गेली आणि तिथे तिने मॉडेलिंग एजन्सीबरोबर करार केला.

हे देखील वाचा