बॉलिवूडची ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी आणि ‘हिमॅन’ धर्मेंद्र यांची लवस्टोरी आजही इंडस्ट्रीमधील सगळ्यात सुंदर लवस्टोरी म्हणून ओळखली जाते. हेमा आणि धर्मेंद्र १९८० मध्ये विवाहबंधनात अडकले होते. दोघांच्या लग्नाला आज ४० वर्ष उलटले तरी पॉवर कपल अशी त्यांची आजही सिनेसृष्टीत ओळख आहे. हेमा आणि धर्मेंद्र यांना सोबत पाहण्यासाठी आजही लाखोंची गर्दी होते, हे त्यांच्या लोकप्रियतेच उदाहरण आहे.
हेमा मालिनी धर्मेंद्रवर इतक प्रेम करत होत्या की आधीच विवाहित आणि मुलं असणाऱ्या धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करत त्यांनी सावत्र आई होण्याचा निर्णय घेतला. मात्र इंडस्ट्रीमध्ये आणि लोकांमध्ये आजही हेमा मालिनी आणि तिच्या सावत्र मुलांच्या संबंधाच्या बाबतीत उलट सुलट चर्चा पाहायला मिळते. हेमा मालिनीचे सनी आणि बॉबी देओल यांच्यात संबंध ठीक नसल्याच्याही चर्चा होत असतात. परंतु याबाबत एका इंटरव्ह्यू मध्ये बोलताना हेमा मालिनी यांनी सनी देओल आणि बॉबी देओलसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितले होते.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, २०१७ मध्ये हेमा मालिनी यांनी ‘बियोंड द ड्रीमगर्ल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी या बाबतीत खुलासा केला होता. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबत त्यांचे खुप सुंदर नाते असल्याचे सांगितले. जेव्हा जेव्हा त्यांना सनी किंवा बॉबी देओलची गरज पडली तेव्हा तेव्हा ते धावुन आल्याचेही त्या पुढे म्हणाल्या.
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, “सगळे विचार करतात की आमचे नाते कसे आहे? तर मी सांगू इच्छिते की, आमच नात खूपच सुंदर आहे, जेव्हा जेव्हा मला त्यांची गरज पडली तेव्हा सनी धर्मेंद्रजीसोबत नेहमी माझ्यासाठी उभा होता. विशेष म्हणजे जेव्हा माझा अपघात झाला तेव्हा माझी विचारपूस करण्यासाठी घरी येणारा सनी पहिला व्यक्ती होता. त्याने डॉक्टर माझी नीट काळजी घेतात की नाही, व्यवस्थित उपचार चालू आहे का? माझ्या चेहर्यावर टाकलेले टाके नीट आहेत का इथपर्यंत सर्व चौकशी केली होती. हे सर्व बघून मला खूप छान वाटले. यावरून तुम्ही आमचे नाते कसे आहे याचा अंदाज लावू शकता.”
हेमा मालिनी यांनी अनेक वेळा बोलताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही माहिती दिली. एका इंटरव्ह्यू मध्ये बोलताना त्यांनी सांगितले होते की, पहिल्या भेटीतच त्या धर्मेंद्रजींच्या प्रेमात पडल्या होत्या. त्या म्हणाल्या, “खुप कमी काळात आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. मी जेव्हा धर्मेंद्र यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हाच आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत असे मला वाटले. मला संपूर्ण आयुष्य त्यांच्या सोबत घालवायचे होते.” असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र सध्या एकमेकांसोबत राहत नाहीत, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धर्मेंद्र घरात न राहता फार्म हाऊसवर राहत आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘टू क्युटीज इन वन फ्रेम’, झी मराठी पुरस्कार सोहळ्यातील नेहा आणि परीचा मोहक फोटो व्हायरल
-‘अगर हम शायर होते तो…’ अनुजा साठेच्या ग्लॅमरस फोटोवरील चाहत्याची कमेंट ठरतीय लक्षवेधी