Monday, July 8, 2024

‘ही पोळी साजूक तुपातली’, म्हणत हेमांगी कवीने शेअर केली कोकणाच्या खाद्यसंस्कृतीवरील पोस्ट

मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय बोल्ड, बिनधास्त आणि परखड मतं मांडणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगी तिच्या भूमिकां इतकीच तिच्या बिनधास्त व्यक्तव्यांसाठी ओळखली जाते. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल हेमांगी व्यक्त होत असते. सर्वच प्रकारच्या भूमिका साकारत स्वतःला एक उत्तम आणि ताकदीची अभिनेत्री सिद्ध केलेल्या हेमांगीच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच गाजताना दिसतात. हेमांगी आणि तिच्या पोस्ट या जणू नेटकऱ्यांमध्ये एक चर्चेचाच विषय ठरत असतो. आपल्या खुमासदार शैलीमध्ये आणि अतिशय समर्पक शब्दांमध्ये पोस्ट टाकत सर्वांचे लक्ष वेधत असते. मुख्य म्हणजे हेमांगीच्या सर्वच पोस्ट तुफान गाजतात आणि व्हायरल देखील होतात.

आता पुन्हा एकदा हेमांगी कवी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. हेमांगीची ही पोस्ट तिच्या इतर पोस्टपेक्षा वेगळी असल्यामुळे जास्तच गाजत आहे. हेमांगीने तिची ही पोस्ट खाद्यसंस्कृतीवर टाकली असून यासोबत तिचा एक फोटो देखील शेअर केला आहे. हेमांगीने शेअर केलेल्या तिच्या फोटोमध्ये तिची वेशभूषा कोळी बायकांसारखी असून, तिने निळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. या फोटोसोबत तिने कोकणातल्या खाण्याच्या पद्धतींबद्दल सांगितले आहे.

हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “ही पोळी साजूक तुपातली हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद!
लग्नाच्या आधी मी फार कमी, कमी म्हणजे नाहीतच जमा, मांसाहार करायचे, मधली ६ वर्ष तर मी अंड सुद्धा खाल्लं नव्हतं. इतकी vegetarian होते. पण मग पुढे लग्न झालं कोकणातल्या माणसासोबत आणि मग काय हळू हळू मांसाहार वाढत गेला. तेव्हा वरील ओळी चपखल आपल्यासाठीच लिहिल्या आहेत असं वाटतं! ???? असं vegetarian to non- vegetarian कोण कोण झालंय सांगा पाहू?
बरं ते जाऊदे… आज कालवणास काय केलंय ते सांगा!”

हेमांगी कवी सध्या तिच्या लेक माझी दुर्गा या मालिकेत काम म्हतावच्या भूमिकेत झळकत आहे. हेमांगीने तिच्या अभिनयाने नाटकं, मालिका, चित्रपट सर्वच माध्यमांमध्ये काम केले असून तिने फु बाई फु या शोमध्ये तिच्यात असणाऱ्या विनोदी अभिनेत्रीला देखील सर्वांसमोर आणले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा