Thursday, March 13, 2025
Home मराठी ‘चित्रपट चालेल नं चालेल तो पुढचा विषय’. म्हणत हेमांगी कवीची आगामी चित्रपटाबद्दल केली पोस्ट झाली व्हायरल

‘चित्रपट चालेल नं चालेल तो पुढचा विषय’. म्हणत हेमांगी कवीची आगामी चित्रपटाबद्दल केली पोस्ट झाली व्हायरल

मराठी सिने अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही सर्वात चर्चित कलाकार म्हणून ओळखली जाते. हेमांगी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या अनेक संवेदनशील विषयांवर ती आपले निर्भिड मत व्यक्त करत असते. तिच्या या सोशल मीडियावरील पोस्टची नेहमीच चर्चा होत असते. सध्या हेमांगीची अशीच एक पोस्ट व्हायरल  होत आहे ज्यामध्ये तिने तिच्या आगामी ‘भारत माझा देश आहे’ चित्रपटाबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे तशीच एक खास गोष्टही सांगितली आहे. काय आहे नेमकी ही पोस्ट चला जाणून  घेऊ.

अभिनेत्री हेमांगी कवीचा भारत माझा देश आहे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा आणि कलाकार यांची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. सिमेवर लढणारा जवान आणि त्याच्या काळजीने त्याच्या घरच्यांच्या जिवाची झालेली घालमेल याबद्दलचे वास्तव सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दलची हेमांगीची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने चित्रपट यशस्वी होण्यापेक्षा रिलीज होतोय हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे.

हेमांगी कवीने आपल्या या व्हायरल पोस्टमध्ये “प्रत्येक कलाकाराला वाटतं आपला सिनेमा सुपरहिट व्हावा, अगदी सुपरहिट वगैरे नाही झाला, निदान थोडा तरी चालावा. किती आनंद असतो त्यात. मला कश्याचा आनंद होतोय माहितेय? या वर्षी माझे सिनेमे किमान ‘प्रदर्शित’ तरी होतायेत याचाच. चित्रपट चालणं न चालणं खूप पुढची गोष्ट.”  असे म्हणत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टमध्ये पुढे बोलताना ती म्हणाली की, “२०१२ साली आलेला पिपाणी हा माझा शेवटचा चित्रपट आहे. त्यानंतर मी साहेब, ‘अन्तर्दाह’, ‘पिज्जा- मुन्ने’, ‘चूक भूल द्यावी घ्यावी’, ‘वऱ्हाडी वाजंत्री’, ‘गडद जांभळ’, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’, ‘स्कूल चलें’, ‘बाहुलीचं लगीन’, अशा तब्बल १२-१३ चित्रपटांमध्ये काम केले मात्र ते चित्रपट काही प्रदर्शितच होऊ शकले नाहीत. प्रत्येक कलाकाराला त्याच्या न प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची झळ बसलेली असते. मात्र माझ्या या चित्रपटांमध्ये मी मन लावून, मेहनत घेऊन या भूमिका साकारल्या होत्या. मात्र ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचल नाहीत याचे दुःख मी तुम्हाला सांगू शकत नाही.”

शेवटी तिच्या चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणते की, मे ला ‘भारत माझा देश आहे’ चित्रपट येतोय, २४ जून ला तमाशा Live येतोय. ‘तिचं शहर होणं’ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतोय, तोही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. आता या चित्रपटांचं काय भविष्य आहे ते वेळच ठरवेल. पण हे चित्रपट प्रदर्शित होतायेत यानेच ‘आनंद पोटात माझ्या माईना’ झालाय. खूप मस्त वाटतंय.” हेमांगीच्या या व्हायरल पोस्टची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा