Thursday, March 13, 2025
Home मराठी माझ्या आयुष्यातील तमाशा..! ‘बाई, बुब्स, ब्राला’ एक वर्ष पूर्ण, हेमांगीची नवी पोस्ट चर्चेत

माझ्या आयुष्यातील तमाशा..! ‘बाई, बुब्स, ब्राला’ एक वर्ष पूर्ण, हेमांगीची नवी पोस्ट चर्चेत

सध्या मराठी सिने जगतात अनेक नाविण्यपूर्ण चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. असाच धमाकेदार चित्रपट उद्या १४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाईव्ह. मराठी सिने जगतात सध्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्याआधी अभिनेत्री हेमांगी कवीने चित्रपटाचे अडव्हान्स तिकीट बुकिंग सुरू असल्याची माहिती सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना दिली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, मराठी सिने जगतात सध्या तमाशा लाईव्ह या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाची सर्वत्र तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, सचिन पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, नागेश भोसले अशा अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे तगडी स्टारकास्ट हे या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरताना दिसत आहे. चित्रपटातील सर्वच कलाकार या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

 

तत्पुर्वी अभिनेत्री हेमांगी कवीची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने माझ्या खूप viral झालेल्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ post ला आज वर्ष पूर्ण होतंय. काही लोकं आजही त्याची खिल्ली उडवत मला आठवण करून देतायेत. Tag करतायेत. ते खिल्ली उडवणारच कारण त्यांना त्यातलं गांभीर्य कळलं नाही आणि ते कधी कळणार ही नाही किंवा त्यांना मुद्दाम कळून घ्यायचं नाही. पण अनेक लोक या trollers एवढेच किंबहुना जास्तच म्हणेन मी खूप sensible, sensitive लोक माझ्या support ला आले आणि माझ्याशी जोडले गेले. खूप मुलींच्या, स्त्रियांच्या मनातल्या कुचंबनेला वाच्या फुटली. माझ्यासाठी हेच महत्वाचं होतं कारण माझा हेतूच तो होता. काही तरी वादग्रस्त, sensational बोलून मला कुठलीही publicity stunt वगैरे करायचा नव्हता. मला माझ्या देशाने व्यक्त व्हायचा अधिकारी दिलाय आणि मला ज्या गोष्टीचा समाजात वावरताना जर त्रास होत असेल तर तो मी बोलून दाखवणार. तसाच व्यक्त व्हायचा अधिकार काही trollers ने घेतला आणि वाट्टेल ते थराला जाऊन troll केलं. अजूनही करतात.

याबद्दलच पुढे बोलताना ती म्हणते की, ते बरोबर की चूक, योग्य की अयोग्य मला माहीत नाही. बस समाज आणि माणूस म्हणून आपण कोण आहोत याची ओळख झाली. मित्र परिवाराने साथ सोडली, काहींनी unfollow केलं, distance तयार केला. अनेक हितचिंतकांचे calls आले. काही support करणारे तर काही भीती दाखवणारे. ‘आता तुझं career धोक्यात येणार, तुला कुणीही काम देणार नाही, तूझी image आता दूषित झाली, प्रेक्षक तुला कधीच स्वीकारणार नाहीत वगैरे वगैरे! मला त्यांना एवढंच सांगायचंय प्रेक्षक म्हणून तुम्ही माझं career हिरावून घेऊ शकता माझं जगणं नाही! मी त्यांच्या या बोलण्यामुळे घाबरले नाही पण वाईट नक्कीच वाटलं होतं. मनात आलं खरंच असं घडलं तर आपण दुसरा मार्ग धरू. दुसरं काहीतरी चांगलं काम करू. पण तसं काही करायची वेळ आली नाही कारण जुलै महिन्याच्या शेवटाला संजय दादांचा ‘तमाशा Live’ साठी call आला आणि दीड दोन महिन्यांचं work shop करून सिनेमा shoot सुद्धा केला आणि आज तो प्रदर्शित होतोय.

शेवटी मानले संजय जाधवांचे आभार –

चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव यांचे आभार मानताना ती म्हणते की, “दादा, या सगळ्या घटनेनंतर ही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात! लोकांनी दाखवलेली भीती खोटी ठरवलीत यासाठी मी कायम ऋणी राहीन! हा सिनेमा तर माझ्यासाठी महत्वाचा आहेच पण मला माझ्यातला आत्मविश्वास जागवण्याची संधी दिलीत त्यासाठी खूप खूप.  मागच्या वर्षी ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ मुळे मी breaking news च्या भोवऱ्यात आले होते आज ‘तमाशा Live’ मुळे बातम्यांच्या वलयात आहे. माझ्या post ची anniversary मी अश्या पद्धतीने celebrate करेन वाटलं नव्हतं. आज चित्रपट प्रदर्शित होतोय खरा पण माझ्या आयुष्यात माझा ‘तमाशा Live’ मागच्या वर्षी याच दिवशी सुरू झाला होत.” सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

हे देखील वाचा