Monday, November 25, 2024
Home टेलिव्हिजन ‘…पण कधीही हिम्मत नाही झाली’, हेमांगी कवीने सांगितला ताज हॉटेलमधील तिचा भन्नाट अनुभव

‘…पण कधीही हिम्मत नाही झाली’, हेमांगी कवीने सांगितला ताज हॉटेलमधील तिचा भन्नाट अनुभव

अभिनेत्री हेमांगी कवी (hemangi kavi) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून तिने लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तसेच अनेकवेळा तिच्या वक्तव्यामुळे वाद देखील निर्माण होतो. अशातच तिचा वाढदिवस साजरा झाला आहे. यावेळी ती ताज हॉटेलमध्ये गेली होती. यावेळीच अनुभव तिने फेसबुकवर शेअर केला आहे.

तिने फोटो शेअर करत लिहिले आहे की, “लहानपणापासून वाटायचं ‘साला एकदा तरी ताज हॉटेल मध्ये जाऊन चहा पिऊन यायचंय यार! चहा सारखा चहा पण त्यावेळी “वाह ताज”तबलावादक उस्ताद झाकीर हुसेनच्या ad मुळे चहाला एक वेगळंच glamour प्राप्त झालं होतं! त्त्यामुळे ताजचा चहा प्यायचं अप्रूप वाढलं. 41 वर्ष मुंबईत राहून ही कधी ताज हॉटेल मध्ये जायची हिंमत नाही झाली. कारण इच्छा असली तरी आपण पडलो typical मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय माणसाला हिंमत गोळा करायला बराच काळ जावा लागतो. मी आजही मध्यम वर्गीयच आहे. घर, गाडी, घरात ac, building ला lift, 24 तास पाणी, वीज, गाठीला थोडा पैसा! ही सगळी साधनं परिस्थिती ‘आता सुधारलीये बरं’ म्हणायला पुरेशी असली तरी middle class mentality, मध्यम वर्गीय ‘मानसिकता’ गळून पाडेल याची guarantee देत नाहीत!”

पुढे तिने लिहिले की, “माझं college ऐन मुंबईतलं, Sir J. J. School of Fine arts! Gateway of India च्या जवळचं! तिथंच मागे उभं असलेलं आणि लहानपणी कुठेतरी चित्रात black n white मध्ये पाहिलेलं हॉटेल ताज! भव्य दिव्य! बाहेरून building इतकी कमाल दिसायची पण साला आत जायची भीती! आत सोडलं नाही तर, हाकलून दिलं तर, अपमान केला तर? आणि समजा गेलोच आत तर 250/300 रुपयांचा फक्त चहा? बाप रे नको! मग ताजकडे पाठ करत, समुद्राकडे बघत, हातात अडीच रुपयांच्या cutting च्या चहावर फुंकर मारत आधीच थंड असलेल्या परिस्थितीला अजून गार करत “ह्या , हे आपलं काम नव्हे” चे घोट प्यायचो! या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी भटकंती झालीये. भारतात, भारताबाहेर, 5stars, 7stars उंची उंची हॉटेल मध्ये राहायलेय.
हेमांगी कवीची संपूर्ण पोस्ट

तिथलं खाल्लय, प्यायलेय. इतक्या वर्षात मोठ्या जागेची, झगमगाटाची, high standard life ची, जगण्याची नाही किमान पाहण्याची तरी सवय आता झालीये खरंतर पण ताज हॉटेल मध्ये जायचा nervousness अजूनही गेला नाही! गेल्या काही वर्षात तर बाहेरदेशात गेलं की तिथल्या खाद्यपदार्थांची किंमत indian rupees मध्ये किती हे न पाहता dollars, euros खर्च केलेत. पण हो बाकी शॉपिंगच्या वेळी calculator app कायम open असतो!” तिने केलेल्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत.
हेही वाचा-
author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा