Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड फोटोत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या सौंदर्याचा सर्व अभिनेत्रींना वाटायचा हेवा, केवळ १९ व्या वर्षी झाले निधन

फोटोत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या सौंदर्याचा सर्व अभिनेत्रींना वाटायचा हेवा, केवळ १९ व्या वर्षी झाले निधन

चाहत्यांना बॉलिवूड कलाकारांचे प्रत्येक फोटो पाहायला आवडतात. विशेषत: त्यांचे आवडते कलाकार आधी कसे दिसायचे, ते कोणते काम करायचे आणि त्यांची लाईफस्टाईल, अशा सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. या क्रमात एका सुपरस्टार नायिकेचा बालपणीचा फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये ती तिच्या भावासोबत दिसत आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे या अभिनेत्रीने अगदी लहान वयात हे जग सोडले आणि आजही चाहते या अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करतात ही आनंदाची बाब आहे.

ही अभिनेत्री खूप कमी वयात सुपरस्टार बनली होती. वयाच्या १९ व्या वर्षी तिने त्या सर्व नायकांसोबत काम केले होते, ज्यांच्यासोबत त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री काम करण्यास इच्छुक होत्या. अनेक अभिनेत्रींनाही या अभिनेत्रीच्या यशाचा हेवा वाटला. फोटोत भावासोबत दिसणाऱ्या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का? जर नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही दुसरी कोणी नसून दिव्या भारती (Divya Bharti) आहे, जी तिच्या काळातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.

Photo Courtesy Instagramdivyabharti queen

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावल्यानंतर दिव्याने १९९२ मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि तिचा पहिला चित्रपट ‘विश्वात्मा’ होता. यादरम्यान ती ‘शोला और शबनम’ , ‘दीवाना’ रंग’, ‘शोला और शबनम’, आणि ‘दिल का क्या कसूर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आणि तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली.

दिव्या त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. तिने प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक साजिद नाडियाडवाल यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या ११ महिन्यांनंतर अशी घटना घडली ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. दिव्याचा तिच्या फ्लॅटमध्ये गूढ परिस्थितीत मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. पाचव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटवरून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. ही हत्या की आत्महत्या, या प्रकरणाचे गूढ आजही उकललेले नाही. २५ फेब्रुवारी १९७४ रोजी जन्मलेल्या दिव्या भारतीचे वयाच्या १९ व्या वर्षी ५ एप्रिल १९९३ रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूने संपुर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती.

हेही वाचा-

हे देखील वाचा