दिग्गज अभिनेता बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे यशस्वी अभिनेत्याचे दृष्टीने पाहिले जाते. त्यांच्या कारकीर्दीने बॉलिवूडसारख्या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी वेगळेच स्थान निर्माण केले आहे. अभिनेता नेहमी आपल्या चित्रपटामुळे किंवा ” ‘कोण बनेगा करोडपती‘ आणि सोशल मीडिया पोस्टमुळे सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतात. मात्र, यावेळेस बिग बी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. ‘व्यक्तीमत्त्व हक्क’ म्हणजेच ‘पर्सनालिटी राईट्स’ धोक्यात आल्याचे सांगत त्यांनी उच्च न्यायालयात तक्रार नोंदवली आहे. म्हणूनच हे ‘पर्सनालिटी राईट्स’ नेमकं आहे तरी कीय आणि याचा अधिकार किंवा हक्क काय असतात. याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. (What is meaning is personality rights?)
अमिताभ बच्चन यांनी नुकतंच आपल्या व्यक्तीमत्वाच्या हक्कासाठी दिल्ली न्यायालयात दवा केला असून न्यायालयाने त्यांनी केलेल्या अर्जाला मंजुरी देखिल दिली आहे. त्याशिवाय आता अमिताभ यांचा आवज किंवा फोटो परवानगीशिवय वापरण्यात आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र, बीग बी यांनी हा अर्ज करण्यामागचे कारण काय आणि ‘पर्सनालिटी राईट्स’चे संरक्षण का मागितले हे जाणून घेणे फारच महत्वाचे आहे.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांची कारकीर्दीत एवढी आहे की, प्रत्येकालाच वाटते की, आपल्या प्रोडक्टला जर त्यांचा फोटो वापरला तर ते जास्त प्रभावशाली बनेल. कोणत्याही पोस्टरवर किंवा जाहिरातीला त्यांच्या फोटो किंवा आवाजाचा वापर सहजच करत असे, अगदी लॉट्रीच्या टिकिटावर आणि नकली नोटांवरही त्यांच्या फोटोंना छापले जायचे. हे सगळे पाहून अभिनेतानी नाराजी व्यक्त केली.
शिवाय ‘कोण बनेगा करोडपती’ अर्थातच केबीसी संबंधीत पुस्तके विकणारे किंवा टी-शर्ट विकणारे असे अनेक व्यापारी त्यांच्या फोटोचा आणि आवाजा उपयोग आपल्या व्यवसायासठी करत असतात. त्यांच्या व्य्कतीमत्वाचा चुकीचा वापर होत असल्याचे दिसून आले, त्यामुळे अभिनेत्याने न्यालयात तक्रार नोंदवली आहे. त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीवर न्यायालयाने सहमती देत विना परवानगी अमिताभ यांचा फोटो आणि आवज वापरुन नये असे सांगिततले आहे. नोंदवलेल्या तक्रारीवर मार्च महिन्यात सुनावनी केली जानार आहे.
भारतीय संविधानाच्या 21 व्या परिच्छेदात गोपनीयता आणि प्रसिद्धीबाबत अधिकार दिला आहे. म्हणजेच कोणतीही स्त्री किंवा पुरुष यांना आपले व्यक्तीमत्व जपण्याचा अधिकार असतो. लोकप्रिय व्यक्तींसाठी हा हक्क खूपच महत्वाचा मानला जातो. त्यांच्या आवाजाचा किंवा फोटोचा गैर वापर होत असेल तर अशाप्रकारच्या वापरावर प्रतिबंद लावण्याचा अधिकार या कायद्याअंर्गत मिळू शकतो. त्याशिवाय त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई देखिल केली जाते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार!’, दिग्गज अभिनेता प्रशांत दामलेंनी शेअर केली पोस्ट
‘भिकू म्हात्रे इस बॅक!’ मुंबई का किंग म्हणत मनोज वाजपेयीने शेअर केली पोस्ट, परततोय का सत्या 2?