Saturday, August 2, 2025
Home भोजपूरी मानधनाच्या बाबतीत ‘हे’ भोजपुरी कलाकार देतात बॉलिवूडच्या कलाकरांना तोडीस तोड टक्कर

मानधनाच्या बाबतीत ‘हे’ भोजपुरी कलाकार देतात बॉलिवूडच्या कलाकरांना तोडीस तोड टक्कर

 

बॉलिवूडला सर्वात मोठी चित्रपट इंडस्ट्री म्हणून ओळखले जाते. मात्र आपल्या देशात बॉलिवूडसोबतच इतरही अनेक फिल्म इंडस्ट्री आहेत. ज्यांना आपण प्रादेशिक इंडस्ट्री म्हणून ओळखतो. पूर्वी देशात फक्त हिंदी चित्रपटांचा बोलबाला होता, मात्र आता विविध प्रादेशिक इंडस्ट्री देखील प्रतिभेच्या जोरावर पुढे आल्या आहेत. प्रादेशिक सिनेसृष्टीमधे एक नाव प्रकर्षाने घ्यायला पाहिजे आणि ते नाव आहे भोजपुरी इंडस्ट्रीचे. मागील काही वर्षांमध्ये भोजपुरी कलाकार, गाणे, सिनेमे चांगलेच हिट होताना दिसत आहे. देशात भोजपुरी कलाकारांची लोकप्रियता ही काही हिंदी अभिनेत्यांपेक्षा कमी नाही. पवन सिंग, खेसारी लाल यादव, रवि किशन, निरहुआ अशा दिग्गज कलाकारांनी आपल्या मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. फक्त देशातच नाही तर परदेशातही भोजपुरी गाण्यांची चर्चा पाहायला मिळते.

गाण्यांबरोबरच आपला लूक आणि बॉडी मुळे हे भोजपुरी कलाकार मोठमोठ्या बॉलिवूड अभिनेत्यांना ही मागे टाकत आहेत. इतकेच नव्हेतर भोजपुरी कलाकार त्यांच्या मानधनामुळे ही चर्चेत असतात. एका चित्रपटासाठी लाखोंच्या घरात मानधन घेतात. ह्या अभिनेत्यांच्या फक्त नावानेच चित्रपट सुपरहिट होतात असे मानले जाते. म्हणूनच ह्या लोकप्रिय अभिनेत्यांना मागेल तेवढी रक्कम देण्यास निर्माते तयार असतात. आज जाणून घेऊया सर्वात जास्त मानधन घेणारे पाच मोठे भोजपुरी कलाकार.

रवि किशन 

रवि किशनला भोजपुरी सिनेसृष्टीचा अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जाते. रवि किशनने फक्त भोजपुरीच नव्हे तर बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटात सुद्धा काम केले आहे.  रवि किशन एका चित्रपटासाठी 20 ते 50 लाख इतकी रक्कम घेतो.

खेसारी लाल यादव 

खेसारी लाल यादवला भोजपुरी चित्रपट क्षेत्रातील सलमान खान म्हणून ओळखले जाते. तो अभिनयासोबत त्याच्या आवाजामुळेही लोकप्रिय आहे. अभिनयाबरोबरच ते गाण्याचे अल्बम सुद्धा तयार करत असतात. एका चित्रपटासाठी खेसारी लाल यादव 35 ते 40 लाख इतकी मोठी रक्कम घेतात.

पवन सिंग

पवन सिंग अभिनेते आणि गायक सुद्धा आहेत. अनेक भोजपुरी चित्रपटात त्यांनी गायक म्हणून काम केले आहे. त्यांनी गायलेल्या गाण्यांनी परदेशातील पब आणि डिस्को मध्ये धुमाकूळ घातला असून, पवन सिंग एका चित्रपटासाठी सुमारे 30 ते 40 लाख इतकी रक्कम घेतात.

दिनेश लाल यादव 

दिनेश लाल यादव भोजपुरी चित्रपट क्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ते गायक सुद्धा आहेत. दिनेश लाल यादव म्हणजेच निरहुआचे चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच लोकप्रिय होतात. अभिनेत्री आम्रपाली आणि निरहुआची पडद्यावरील जोडी खूपच लोकप्रिय ठरली होती. दिनेश लाल यादव एका चित्रपटासाठी 30 ते 35 लाख रुपये मानधन घेतात.

रितेश पांडेय

रितेश पांडेय भोजपुरी चित्रपट क्षेत्रातील देखणा अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. रितेश प्रसिद्ध गायक सुद्धा आहे. रितेश पांडेय एका चित्रपटासाठी 15 ते 20 लाख इतकी रक्कम मानधन म्हणून घेतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर

आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स

भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ऐकून नाचू लागतील चाहते

हे देखील वाचा