Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड इंस्टाग्रामच्या एका पोस्टमधून करोडो रुपयांची कमाई करणारे बॉलिवूड स्टार

इंस्टाग्रामच्या एका पोस्टमधून करोडो रुपयांची कमाई करणारे बॉलिवूड स्टार

मित्रांनो तुम्ही सोशल मीडिया वापरता ना? आता म्हणाल काहीही काय प्रश्न विचारताय… कारण सोशल मीडियाचा वापर आता सर्रास होतो. बरोबर, त्याचमुळे तुम्ही अनेकदा सेलिब्रेटिंनी टाकलेल्या पोस्ट लाईक करून त्याबद्दल कधीतरी चर्चाही केलीच असेल ना. पण तुम्हाला हे माहित आहे का की अनेक असे सेलिब्रेटी आहेत, जे सोशल मीडियातून कोट्यावधी रुपये कमावतात. तर मंडळी तुमच्या साधारण लक्षात आलंच असेल आपला आजचा विषय आहे काय… आपण या व्हिडिओतून त्या काही बॉलिवूड सेलिब्रेटींबद्दल जाणून घेऊ, जे इंस्टाग्रामवरून कोट्यावधींची कमाई करतात.

या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्राचे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने करोडोंच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियंकाला सोशल मीडियावरही लाखो चाहते फॉलो करतात. तिला ७९ मिलियनहून अधिक फॉलोवर्स इंस्टाग्रामवर आहेत. ती केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर हॉलिवूडमध्येही काम करताना दिसते. तिच्या फॉलोअर्सची संख्या पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल, की ती एका पोस्टचे किती रुपये घेत असेल. अनेक रिपोर्ट्सनुसार ती एका पोस्टमागे १.८ कोटी रुपये घेते.

एकापाठोपाठ एक अनेक हिट चित्रपट देणारी आलिया भट देखील या यादीत आहे. कमी वयापासूनच अभिनयाला सुरूवात केलेल्या आलियाने अगदी कमी कालावधीच मोठा चाहतावर्ग मिळवला. ती देखील सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत असते, ज्यावर तिचे चाहते विविध प्रतिक्रिया देत असतात. तिला 66 मिलियनहून अधिक फॉलोवर्स इंस्टाग्रामला असून ती एका स्पॉन्सर पोस्टचे साधारण १ कोटी रुपये घेते.

बॉलिवूडमधील मस्तानी दिपिका पदुकोणचे करोडो दिवाने आहेत. ती तिच्या सौदर्याने आणि अभिनयाने सर्वांनाच भूरळ पाडत असते. याबरोबरच ती सोशल मीडियावरही बऱ्याचदा ऍक्टिव्ह असते आणि विविध पोस्ट टाकत असते. यातील अनेक पोस्ट स्पॉन्सरही असतात. तिला ६७ मिलियनहून अधिक फॉलोवर्स इंस्टाग्रामला आहेत. ती बॉलिवूडमधील सध्याची सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असून ती इंस्टाग्रामवरूनही कोट्यावधी रुपये कमावते. अनेक रिपोर्ट्सनुसार दिपीका एका स्पॉन्सर पोस्टचे १.५ कोटी रुपये घेते.

किंग खान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शाहरुख खानचाही चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या काही दशकांपासून त्याने त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर गारुड घातले आहे. रोमँटिक हिरो, ऍक्शन हिरो म्हणून अनेक चित्रपट केलेल्या शाहरुखला 29 मिलियनपेक्षाही अधिक फॉलोवर्स इंस्टाग्रामवर आहेत. रिपोर्ट्सनुसार तो स्पॉन्सर पोस्टचे प्रत्येकी जवळपास ८० लाख ते १ कोटी रुपये घेतो.

शाहरुखप्रमाणेच अक्षय कुमारही या यादीत येतो. खिलाडी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अक्षयने ऍक्शन, विनोदी, रोमँटिक अशा विविध प्रकारातील चित्रपट त्याच्या कारकिर्दीत केले आहेत. त्यामुळे त्याची फॅन फॉलोविंगही जबरदस्त आहे. अक्षयला इंस्टाग्रामवर 62 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. तो देखील इंस्टाग्रामवरून मोठी कमाई करतो. तो एका स्पॉन्सर पोस्टमागे अनेक रिपोर्ट्सनुसार जवळपास १ कोटी रुपये घेतो.

याशिवाय कटरिना कैफदेखील देखील इंस्टाग्रामवरून चांगली कमाई करते. तीच्या एका पोस्टमागे तिला साधारण ९७ लाख रुपये मिळतात असं अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. तिला 65 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स इंस्टाग्रामवर आहेत.

अभिनेत्री श्रद्धा कपूरही या यादीत असून तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला ७३ मिलियनपेक्षाही अधिक फॉलेवर्स आहेत. ती देखील प्रत्येक स्पॉन्सर पोस्टमागे १.१ कोटी रुपये घेत असल्याचे सांगितले जाते.

इथे पाहा व्हिडिओ: इंस्टाग्रामच्या एका पोस्टमधून करोडो रुपयांची कमाई करणारे बॉलिवूड स्टार |Bollywood stars on Instagram

हे देखील वाचा