राजश्री प्रॉडक्शनच्या सर्वात जास्त गाजलेला सिनेमा कोणता? असा प्रश्न जर कोणी विचारला तर सर्वात आधी डोक्यात नाव येते ते ‘हम आपके है कौन’चे. या सिनेमाने अमाप लोकप्रियता मिळतील. ऑल टाइम ब्लॉकबस्टर म्हणून हा सिनेमा ओळखला जातो. अतिशय प्रभावी कलाकार, उत्तम संगीत, उत्तम दिग्दर्शन आदी सर्वच गोष्टी योग्य जमून आल्याने हा सिनेमा अतिशय हिट झाला. आजही या सिनेमाची भरपूर चर्चा तर होतेच शिवाय अनेकदा पाहूनही पुन्हा नावाने हा सिनेमा पाहिला जातो. या सिनेमात मनोरंजनविश्वातील अतिशय दिग्गज कलाकारांची तगडी फौज होती. यात नव्या दमाचे कलाकार तर होतेच सोबतच अनुभवी कलाकार देखील होते. अशाच एक होत्या जेष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी.
हम आपके हैं कौन सिनेमाच्या निमित्ताने त्या पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आणि दमदार कलाकारांसोबत काम करत होत्या. त्यांची सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत ओळख झाली. हिमानी यांनी या सिनेमात ‘चाची’ सतीश शाह यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. हिमानी यांनी त्यांच्या आणि माधुरीच्या पहिल्या भेटीचा एक किस्सा सर्वांना सांगितला होता.
हिमानी म्हणाल्या, “जेव्हा पहिल्यांदा मला सुरज बाबू हम आपके है कौनच्या सेटवर घेऊन गेले तेव्हा सेटवर असणारे सर्व कलाकार माधुरीसोबत बोलत बसले होते. तेव्हा माधुरी मोठी अभिनेत्री झाली होती. मी गेल्यानंतर सुरज बाबूंनी माझी ओळख करून दिली. ते म्हणाले, या मोठ्या आणि अनुभवी अभिनेत्री हिमानी शिवपुरी आहेत. माधुरी खुर्चीवर बसली होती, मात्र जेव्हा सूरज बाबूंनी माझी ओळख करून दिले तेव्हा लगेच ती खुर्चीवरून उठली आणि उभी राहिली. तिला पाहून मला खूपच प्रेरणा मिळाली. मनात आपल्या टॉप अभिनेत्री होण्याचा कोणताही बडेजावपणा न अनंत ती उभी राहिली. ते पाहून मला तिचा आदर वाटलं. आम्ही तेव्हा नवीन होतो, मात्र नंतर ओळख झाल्यावर सिनेमाच्या सेटवर खूप मस्ती करायचो, सर्वांना त्रास द्यायचो.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शशांक केतकरने दिली भारतीयांना लंडनमध्ये जॉबची संधी; मिळणार २८ लाख पगार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…