टीव्ही अभिनेता आणि ‘बिग बॉस’ फेम सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मित मृत्यूने सर्वजण हैराण झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र सिद्धार्थच्या चर्चा आहेत. २ सप्टेंबरला सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याची खास मैत्रीण शहनाझ गिल खूपच खचली आहे. त्याचवेळी, टीव्ही कलाकार देखील सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवू शकत नाही. ‘बिग बॉस’ शोचा उपविजेता आसीम रियाज जो १३ व्या सीझनमध्ये सिद्धार्थसोबत दिसला होता, त्याला ही विश्वास बसत नाही की, ज्याने त्याला शोमध्ये लहान भाऊ म्हटले, तो आता या जगात नाही. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आसीमच्या मानसिक स्थितीविषयी त्याची गर्लफ्रेंड हिमांशी खुरानाने सांगितले आहे.
असे म्हणतात की, नियतीचा खेळ कोणीही चुकवून शकत नाही. लाखो हृदयावर राज्य करणाऱ्या सिद्धार्थ शुक्लासोबत नियतीने ही असाच खेळ खेळला आहे. वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थला आपला प्राण गमवावा लागला. सिद्धार्थच्या निधनाने प्रत्येकाचे डोळे पाणावले आहे. आसीम देखील सिद्धार्थच्या मृत्यूने पूर्णपणे तुटून गेला आहे. (himanshi khurana says asim riaz is still thinking about sidharth shukla and watching their videos)
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर खूपच खचलाय आसीम रियाज
सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर आसीम फक्त कूपर हॉस्पिटलमध्येच दिसला नाही, तर तो या दु: खाच्या काळात त्याच्या आई आणि बहिणींच्या सोबत होता. सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराच्या वेळी, तो स्वत: देखील खूप खचलेला दिसत होता.
२ सप्टेंबरला सकाळी स्वप्नात दिसला सिद्धार्थ
आसीम रियाजची गर्लफ्रेंड हिमांशी खुरानाने सांगितले की, २ सप्टेंबर रोजी आसीमला सिद्धार्थ स्वप्नात दिसला होता. आसीमने स्वप्नात पाहिले होते की, सिद्धार्थ त्याच्या बिग बॉस प्रवासाचा व्हिडिओ पाहत आहे आणि मग तो येऊन त्याला मिठी मारतो. पण आसीमला काय माहीत होते की, सिद्धार्थ जो त्याला लहान भाऊ मानत होता, त्याला सोडून जाईल.
अजूनही धक्क्यात आहे आसीम
माध्यमांतील वृत्तानुसार, आसीमची गर्लफ्रेंड हिमांशी म्हणाली की, “तो या घटनेमुळे अजून ही धक्क्यात आहे. तो अजून ही सिद्धार्थबद्दल विचार करत आहे. त्याचबरोबर त्यांचे व्हिडिओ देखील सारखं पाहत आहे.”
‘बिग बॉस’मध्ये झाली होती दोघांची भेट
आसीम रियाज आणि सिद्धार्थ शुक्लाची भेट ‘बिग बॉस १३’ मध्ये झाली होती. या शोच्या सुरुवातीला दोघांमध्ये खूप प्रेम आणि मैत्री होती. सिद्धार्थ आसीमला आपला लहान भाऊ मानत होता. पण त्यानंतर दोघांमध्ये अनेक वेळा भांडणंही झाली. मात्र हा शो संपण्यापूर्वी दोघांनी एकमेकांमधील वाद विसरून पुन्हा नव्याने सुरुवात केली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-TMKOC: जेठालाल झाला गंभीर जखमी, तर ‘यामुळे’ पोलिसांना करावी लागली गोकुळधाम सोसायटीच्या लोकांना अटक
-अरेरे! प्रार्थना अन् मायराच्या चेहऱ्याला नेमकं झालं तरी काय? नेटकऱ्यांचाही उमटतायेत प्रतिक्रिया
-‘मैं नहीं नाचती, मेरा दिल नाचता है…’, मस्तानी बनली मराठमोळी मानसी नाईक; पाहून पती म्हणतोय…