Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

यामी गौतमने मिळवला हिना खानच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ताबा, परत देण्यासाठी ठेवली ‘ही’ अट

हिना खान ही टेलिव्हिजनवरील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते तसेच अनेक पॉप्युलर ट्रेंडमध्ये ती दिसते. तिची ही प्रत्येक गोष्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडते. अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. परंतु या आधी ती काही म्हणते. अभिनेत्री यामी गौतमने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ताबा मिळवला आहे आणि ती म्हणते की, हिनाला तिच्या आयुष्यातील असा एक किस्सा सांगायचा आहे. जेव्हा ती कंट्रोलच्या बाहेर गेली, तेव्हाच तिला तिचे अकाऊंट परत मिळेल.

यानंतर हिना खानने (Hina khan0 एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने यामी गौतमचा (Yami Guatam) टास्क पूर्ण केला आहे. तिने आयुष्यातील तो किस्सा सांगितला जेव्हा ती आउट ऑफ कंट्रोल झाली होती. या व्हिडिओमध्ये तिने हे देखील सांगितले आहे की, तिला या इंडस्ट्रीमध्ये १३ वर्ष पूर्ण झाले आहेत. तिला खूप लोकप्रियता देखील मिळाली; परंतु या सगळ्यात तिने तिची ओळख गमावली. कारण तिला लोक फक्त अक्षरा या नावाने ओळखत असत. (Hina Khan Instagram hacked by yami Gautam release a Thursday movie)

हिना या व्हिडिओमध्ये म्हणते की, “मी टेलिव्हिजनवरील ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ या शोमध्ये अनेक वर्ष अक्षरा ही भूमिका निभावली आहे. अनेक दिवस कितीतरी तास काम करून माझे स्वप्न पूर्ण केले आहे. परंतु मला मिळालेल्या यशानंतर देखील मी संतुष्ट नव्हते. माझी तब्येत बिघडली होती. परंतु अभिनय माझा आनंद आणि सपोर्ट होता.”

हिना खान पुढे म्हणते की, “जर मी हा शो सोडला असता, तर माझे करीअर संपण्याचा अंदाज लावला जात होता. परंतु मी असे केले नाही. तेव्हा मी माझे कर्ज देखील फेडत होते. मला हे करावे लागणारच होते, नाहीतर आज मी जिथे आहे तिथे नसते. हा निर्णय कठीण होता परंतु यानेच माझ्या आयुष्यात बदल येणार होता.”

हिना खानने यानंतर यामी गौतमला तिचे अकाऊंट परत देण्याची विनंती केली. हिना आणि यामी त्यांचा आगामी चित्रपट ‘ए थर्सडे’ या चित्रपटाचे हटके पद्धतीने प्रमोशन करत होते. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा चित्रपट १७ फेब्रुवारी रोजी डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा