टीव्ही अभिनेत्री हिना खान हिच्या वडिलांचे मागच्या महिन्यात म्हणजे 20 एप्रिलला निधन झाले आहे. तिच्या वडिलांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे. वडिलांच्या आठवणीत हिना खानने एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हिना तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहे.
हिना खानने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून असे समजते की, हिना खानच्या वडिलांना काही तरी गिफ्ट दिले आहे आणि नंतर हा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये हिना तिचा भाऊ, आई आणि वडिलांसोबत दिसत आहे.
तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सगळेजण ‘गोलमाल’ (1979) या चित्रपटातील ‘आने वाला पल जाने वाला है’ हे गाणे गात आहेत. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “आज एक महिना पूर्ण झाला आहे. पप्पा मला तुमची खूप आठवण येत आहे.” या सोबतच तिने हृदय तुटण्याच्या ईमोजी पोस्ट केल्या आहेत.
हिना खानचा हा व्हिडिओ पाहून तिचे अनेक चाहते देखील भावुक झाले आहेत. अनेकजण तिला कमेंट करून स्ट्रॉंग राहा असा संदेश देत आहेत. तिच्या एका चाहत्याने सांगितले की, “जर तूच हिम्मत हारली, तर तुझ्या कुटुंबाचे कसे होणार.”
हिना खानच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुखःचा डोंगर पसरला होता. त्यानंतर हिनाला कोरोनाची लागण झाल्याने तिला तिच्या आईसोबत जास्त वेळ घालवता देखील आता नव्हता. याबाबत तिने एक पोस्ट करून तिच्या मनातले दुखः व्यक्त केले होते.
हिना खान ही सध्या तिचे ‘पत्थर वर्गी’ या पंजाबी गाण्यामुळे खूप चर्चेत आहे. या गाण्यात हिनासोबत तन्मय सिंग दिसत आहे. तिच्या या गाण्याला चाहते खूप पसंत करत आहेत. बी प्राक यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. जानी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत, तर रणवीरने हे गाणे गायले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान










