पूर्वी टेलिव्हिजन इंडस्ट्रीला चित्रपट इंडस्ट्रीपेक्षा कमी लेखले जायचे. मात्र काळ बदलला आणि हा विचारही. आजच्या काळात बॉलिवूड अभिनेत्रींएवढीच किंबहुना जरा जास्तच लोकप्रियता आणि प्रसिद्धी टीव्ही क्षेत्रातील अभिनेत्रीची आहे. बॉलिवूड अभिनेत्रींना सर्वच बाबतीत तोडीस तोड टक्कर देणाऱ्या या टीव्ही अभिनेत्रींमध्ये सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे हिना खान. हिनाने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी आणि कायमस्वरूपीची जागा निर्माण केली आहे.
हिना जेवढी तिच्या कामामुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे खूपच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये हिना सर्वात टॉपवर आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून रातोरात प्रसिद्ध झालेल्या हिनाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे काही सुंदर आणि आकर्षक फोटो पोस्ट केले आहे. तिच्या या फोटोंमुळे हिनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हिनाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचा लूक पारंपरिक असून यात ती अतिशय सुरेख दिसत आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हिनाने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. या ड्रेसवर तिने गळ्यात चोकर नेकलेस, कपाळावर छोटी टिकली, कानात नाजूक आणि चोकरला साजेसे कानातले घातले असून तिचा हा लूक तिने नोजरिंगने पूर्ण केला आहे. डार्क रंगाच्या बॅकग्राउंडमध्ये हातात लाइट्स घेतलेल्या हिनाचा लूक अतिशय उठून येत आहे. तिच्या या फोटोंवर फॅन्सने तर लाईक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कलाकार देखील तिच्या या लुकला विविध कॉम्प्लिमेंट देत आहे.
हिनाची लोकप्रियता तिच्या सोशल मीडियावरील फॉलोवर्सच्या संख्येवरुनच लक्षात येते. चीनला इंस्टग्रामवर १५ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, हिनाचे अनेक म्युझिक अल्बम्स प्रदर्शित झाले आहे. याशिवाय ती बिग बॉस आणि खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-