Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड ‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

लाहोरमधील ऐतिहासिक मशिदीत डान्स व्हिडिओच्या शूटिंगशी संबंधित प्रकरणात पाकिस्तानी न्यायालयाने बुधवारी ‘हिंदी मिडीयम’ फेम अभिनेत्री सबा कमरवर आरोप केला आहे. संबंधित प्रकरणाची गेल्या वर्षी नोंद करण्यात आली होती. सबा कमर आणि गायक बिलाल सईद न्यायदंडाधिकारी जावेरिया भट्टी यांच्या न्यायालयात आरोप करताना उपस्थित होते.

दोघांवर वजीर खान मशिदीची (लाहोरच्या जुन्या शहरात) विटंबना केल्याचा आरोप आहे. दंडाधिकाऱ्यांनी फिर्यादीला त्यांचे साक्षीदार १४ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणीदरम्यान सादर करण्याचे निर्देश दिले. दोन्ही आरोपींनी कोर्टापुढे गुन्हा कबूल केला नाही आणि तर केस लढतील असे सांगण्यात आले आहे.

एफआयआरनुसार, सबा आणि बिलाल यांनी मशिदीसमोर डान्स करताना व्हिडिओ शूट केला होता. या घटनेवर पाकिस्तानच्या जनतेनेही नाराजी व्यक्त केली होती. पंजाब प्रांताच्या सरकारने या संदर्भात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर अभिनेत्रीवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. मात्र, सोशल मीडियावर याचा सामना केल्यानंतर सबा आणि बिलाल दोघांनीही माफी मागितली होती. २०२० मध्ये लाहोर पोलिसांनी मस्जिद वजीर खानचा अपमान केल्याबद्दल सबा कमर आणि गायक बिलाल सईद यांच्याविरोधात पाकिस्तानी दंड संहितेच्या कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

सबा म्हणाली की, “मशिदीत कोणतेही डान्स किंवा संगीत नव्हते. मला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे.” लाहोर पोलिसांनी गेल्या वर्षी लाहोरच्या जुन्या शहरात असलेल्या वजीर खान मशिदीचा अपमान केल्याच्या आरोपाखाली सबा कमर आणि सईदविरोधात गुन्हा दाखल केला होता. एफआयआरनुसार, दोन्ही कलाकारांनी डान्सचा व्हिडिओ बनवून मशिदीची विटंबना केली.

अभिनेत्रीने तिच्या स्पष्टीकरणात म्हटले होते की, हा निकाह (लग्नाचा) देखावा असलेला म्युझिक व्हिडिओ होता. हे कोणत्याही प्रकारच्या बॅकग्राऊंडसह चित्रित केले गेले नाही किंवा ते संगीत ट्रॅकमध्ये संपादित केले गेले नाही. सबा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती पाकिस्तानची प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहे. ‘हिंदी मीडियम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर फिल्मफेअरने तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री म्हणून नामांकित केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष

-देखणं रूप! हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली अन् पिवळी साडी नेसून राजेश्वरीने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा