Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड ठरलं तर! ‘या’ दिवशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार कंगना रणौतचा बहुचर्चित ‘थलायवी’

ठरलं तर! ‘या’ दिवशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार कंगना रणौतचा बहुचर्चित ‘थलायवी’

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंगनाचा नवीन चित्रपट ‘थलायवी’ तिच्या चाहत्यांना घरी बसून हिंदीमध्ये उपलब्ध होणार आहे. चित्रपटाच्या तमिळ आणि तेलुगू आवृत्त्या मात्र १० सप्टेंबर रोजी चित्रपटाच्या प्रस्तावित प्रदर्शनानंतर केवळ चार आठवड्यांनी ओटीटीवर प्रदर्शित होईल. पण, चित्रपटाची हिंदी आवृत्ती नेटफ्लिक्सवर २४ सप्टेंबरला किंवा त्यानंतरच्या कोणत्याही दिवशी प्रदर्शित होऊ शकते. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपट निर्माते आणि थिएटर मालकांमध्ये त्याच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत वाद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील दोन सर्वात मोठ्या मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर आणि आयनॉक्सने या चित्रपटाची हिंदी आवृत्ती प्रदर्शित केली आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे.

कोरोना संक्रमण काळापासून भारतासह जगभरातील सिनेमांचा व्यवसाय अडखळला आहे. गेल्या महिन्यात चित्रपटगृहांविषयी प्रेक्षकांमध्ये फारसा उत्साह नव्हता. जुलै आणि ऑगस्टमध्येही जगातील इतर देशांमध्ये अशीच परिस्थिती दिसून आली. नवीन चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा ट्रेंड गेल्या वर्षीपासूनच सुरू झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटगृह आणि ओटीटीवर एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित करण्याची सुरुवात भारतात ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाने झाली आणि आता चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर ओटीटीवर प्रदर्शित व्हावे अशी निर्मात्यांची इच्छा आहे.

कोरोनाच्या संक्रमणाआधी चित्रपट वितरक आणि निर्मात्यांच्या परस्पर संमतीने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवडयांनी ओटीटीवरील प्रदर्शित केला जायचा. मात्र कोरोनामुळे हा कालावधी कमी करून चार आठवडे केला गेला. वितरकांनी यावरही आक्षेप घेतला नाही. पण आता हिंदी भाषेतील ‘थलायवी’ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर केवळ दोनच आठवड्यांत ओटीटीवर प्रदर्शित करण्याला निरोध होत आहे.

हिंदी भाषेतील ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रदर्शन अजूनही संकटात आहे. चित्रपट वितरक आणि प्रदर्शकांचे म्हणणे आहे की, जर चित्रपट दोन आठवड्यांनंतर ओटीटीवर येणार असेल, तर चित्रपटगृहांमध्ये कोणीही सिनेमा पाहण्यासाठी येणार नाही. तर दुसरीकडे चित्रपटाच्या निर्मात्यांची अशी बाजू आहे की, कोरोनामुळे त्यांची पहिली प्राथमिकता ही चित्रपटातील त्यांची गुंतवणूक परत मिळवणे आहे आणि त्याचमुळे सिनेमाच्या प्रदर्शनानंतर दोन आठवड्यांनी हिंदी भाषेतील सिनेमा ओटीटीवर आणण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

‘थलायवी’ चित्रपटाच्या निर्मात्यांची पहिली प्राथमिकता सध्या फक्त तमिळ आणि तेलुगू भासत सिनेमा असल्याचेच दिसत आहे. मात्र, हिंदीमध्येही या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. ‘थलायवी’ चित्रपटामध्ये आपल्याला तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास पाहायला मिळणार आहे. कंगनाचा बहूचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

 

 

हे देखील वाचा