Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

आमिरने विनंती करूनही ऋतिक रोशनने दिला होता ‘रंग दे बसंती’ला नकार; मग पुढे अभिनेत्याने…

 

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफी ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या पुस्तकात ‘रंग दे बसंती’ चित्रपट बनवण्यामध्ये किती अडचणी आल्या याबद्दल माहिती दिली आहे. या सिनेमात करण सिंघानिया या भूमिकेसाठी कोणाला घ्यावे हेच समजत नव्हते. या रोलसाठी फरहान अख्तर, अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन यांना देखील विचारणा केली गेली होती. मात्र या सर्वांनी या रोलसाठी नकार दिला. या भूमिकेसाठी सर्वात आधी फरहान अख्तरला विचारणा केली गेली. तेव्हा त्याला दिग्दर्शक म्हणून काम करायचे होते. यासाठी त्याने या भूमिकेसाठी नकार दिला. त्यानंतर अभिषेक बच्चनला ही भूमिका ऑफर केली. त्याने देखील खूप रस दाखवला नाही. या भूमिकेसाठी कोणाला घ्यावे हा मोठा प्रश्न समोर होता. तेव्हा मेहरा यांनी आमिरसोबत चर्चा केली आणि आमिरने हृतिकचे नाव सांगितले.

या भूमिकेसाठी चर्चा करायला आमिर हृतिकच्या घरी देखील गेला. आणि त्याला समजावले की सिनेमा चांगला आहे कर, मात्र त्यानेही नकार दिला. त्यानंतर हा सिनेमा तामिळ अभिनेता सिद्धार्थच्या झोळीत पडला. राकेश ओमप्रकश मेहरा यांना लेफ्टिनेंट अजय राठोड या भूमिकेसाठी शाहरुख खान पाहिजे होता. मात्र तो तेव्हा ‘स्वदेस’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने ही भूमिक आर. माधवने केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

-निळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं मृण्मयी देशपाडेचं रूप, फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

-मयुरी देशमुखच्या नव्या लूकने वेधले चाहत्यांचे मन; काळ्या डॉटेड पोल्कोमधील फोटो झाला व्हायरल

हे देखील वाचा