Tuesday, March 10, 2026
Home बॉलीवूड सिद्धार्थ शुक्ला निधन: नेमकं काय झालं होतं ‘त्या’ रात्री, हिंदुस्तानी भाऊने केले खुलासे

सिद्धार्थ शुक्ला निधन: नेमकं काय झालं होतं ‘त्या’ रात्री, हिंदुस्तानी भाऊने केले खुलासे

टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्याच्या निधनामुळे फक्त जवळच्या व्यक्तींना धक्का बसला नसून, संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या अकाली निधनामुळे बरेच लोक खचले आहेत. त्याचे मित्र आणि प्रियजन त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी सतत प्रार्थना करत आहेत. ‘बिग बॉस १३’ स्पर्धक विकास पाठक, जो ‘हिंदुस्तानी भाऊ’ म्हणून प्रसिद्ध आहे, तो देखील दिवंगत अभिनेता सिद्धार्थच्या घरी त्यांचे सांत्वन देण्यासाठी पोहचला.

हिंदुस्थानी भाऊ पोहोचला सिद्धार्थच्या आईला भेटायला
पॅपराजी व्हायरल भयानीने हिंदुस्तानी भाऊच्या संभाषणाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. हिंदुस्थानी भाऊने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या काही तास आधी काय झाले ते सांगितले. हिंदुस्थानी भाऊने सिद्धार्थ शुक्लाची आई रीता यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या आधारे माध्यमांसोबत या गोष्टी शेअर केल्या. सिद्धार्थने १-२ सप्टेंबर २०२१ च्या मध्यरात्री काय केले ते सांगितले. (Hindustani Bhau reached the house of late actor Siddharth and made many revelations)

हिंदुस्थानी भाऊने सांगितली त्या रात्रीची गोष्ट
तो म्हणाला की, “सर्व काही ठीक होते, सिद्धार्थने रात्रीचे जेवण केले आणि तो झोपी गेला. ३:३० वाजता त्याने त्याच्या आईला एक ग्लास थंड पाणी मागितले, कारण त्याला अस्वस्थ वाटत होते. त्याच्या आईने त्याला पाणी दिले. नंतर त्याने आईस्क्रीम देखील खाल्ले आणि झोपायला गेला. सिद्धार्थ सकाळी १० च्या सुमारास त्याच्या जिम सेशनसाठी उठायचा, पण त्या दिवशी सकाळी अलार्म वाजला तरी तो १० पर्यंत उठलाच नाही. मग त्याची आई त्याच्या खोलीत गेली आणि मग त्यांना सर्व गोष्टींची माहिती झाली.”

‘बिग बॉस १३’मध्ये सिद्धार्थ-हिंदुस्थानी भाऊ

सिद्धार्थ शुक्लाबद्दल शोक व्यक्त करत हिंदुस्तानी भाऊने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये लिहिले की, ‘RIP मित्रा.’ हिंदुस्थानी भाऊ देखील ‘बिग बॉस १३’ चा एक भाग होता. शो दरम्यान त्याचे सिद्धार्थसोबत फारसे चांगले संबंध नव्हते.

https://www.instagram.com/p/CTUKizIlH1K/?utm_source=ig_web_copy_link

सिद्धार्थ शुक्लाचे निधन
लोकप्रिय टीव्ही अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’ विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या प्रियजनांनी आणि कुटुंबाने त्याला अंतिम निरोप दिला. सिद्धार्थ शुक्ला ४० वर्षांचा होता. त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि दोन बहिणी आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

हे देखील वाचा