Wednesday, June 26, 2024

‘या’ कारणामुळे दिल्लीची असूनही दिल्लीमध्ये राहत नाही अभिनेत्री सान्या मल्होत्रा, म्हणाली ‘तिथे एकही महिला…’

राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) ​​स्टारर ‘हिट – द फर्स्ट केस’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा बहुचर्चित चित्रपट १५ जुलै म्हणजेच  या शुक्रवारी रिलीज होणार आहे. सध्या दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.  तेलुगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये राजकुमार राव विक्रम जयसिंगच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सान्या मल्होत्रा ​​तेलंगणा राज्याच्या होमिसाईड इंटरव्हेंशन टीम (एचआयटी) मधील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, जेव्हा मीडियाने अभिनेत्रीला विचारले की ती मूळची दिल्लीची का आहे, तरीही ती आपला बहुतेक वेळ मुंबईत घालवते. त्यानंतर अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ. 
अभिनेत्री सान्य मल्होत्राने दिल्लीची असून कायम मुंबईमध्ये राहण्याचे धक्कादायक कारण सांगितले आहे. सान्या मल्होत्रा ​​म्हणाली की “मी दिल्लीची आहे पण मला राजधानीपेक्षा मुंबई अधिक सुरक्षित वाटते. मी दिल्लीची आहे पण मला मुंबई जास्त आवडते. त्यामागे एक मोठं कारण आहे. खरं तर मला मुंबई हे दिल्लीपेक्षा सुरक्षित शहर वाटतं. सुरक्षेच्या बाबतीत दिल्ली किती सुधारली आहे हे मला माहीत नाही. पण मला इथे सुरक्षित वाटत नाही. फक्त मीच नाही, दिल्लीत राहणाऱ्या प्रत्येक महिलेला असे वाटले असेल. कारण दिल्लीत अशी एकही महिला नसेल जिला छेडछाडीचा सामना करावा लागला नसेल.”
दरम्यान येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणारा डॉ. शैलेश कोलानु दिग्दर्शित ‘हिट: द फर्स्ट केस’ हा चित्रपट दिल राजू प्रॉडक्शन आणि टी-सीरीजच्या बॅनरखाली निर्मित आहे, तर त्याचे संवाद गिरीश कोहली यांनी लिहिले आहेत. एक्शन, क्राईम, ड्रामा, मिस्ट्री आणि थ्रिलर सगळंच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 15 जुलै 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या बहुचर्चित चित्रपटाची आता प्रेक्षकांनाही चांगलीच उत्सुकता लागलेली दिसत आहे.

हेही वाचा – काळजात देशभक्तीची ज्योत पेटवणाऱ्या ‘या’ पाच वेबसिरीज एकदा पाहाच

‘तमाशा लाईव्ह’ची एवढी चर्चा होण्याचं कारण काय?

‘जिवाची होतिया काहिली’ या नव्या मालिकेतून उलगडणार कानडी तडक्याची नवी प्रेमकहाणी

हे देखील वाचा