Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड राखी सावंतने सांगितला होळीचा किस्सा, जेव्हा तिने फुगे समजून कंडोममध्ये भरले होते पाणी तेव्हा…

राखी सावंतने सांगितला होळीचा किस्सा, जेव्हा तिने फुगे समजून कंडोममध्ये भरले होते पाणी तेव्हा…

मनोरंजनविश्वातील सर्वात कॉंट्रोव्हर्सी आणि ड्रामा क्वीन म्हणून राखी सावंत (Rakhi Sawant) ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये छोट्या भूमिका आणि आयटम सॉन्ग करणारी राखी तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या विचित्र वक्तव्यांमुळे, वैयक्तिक आयुष्यामुळे आणि हटके कपड्यांमुळे जास्तच लाइमलाईट्मधे असते. राखी नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर नुसता आरडाओरडा, बेताल बोलणे, प्रसिद्धीसाठी काहीही करणारी आणि वादांमध्ये राहणारी व्यक्ती येते. राखीने बिग बॉस 15 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आणि सुन्न झालेल्या या घरात अचानक एक ऊर्जा भरली आणि बिग बॉसचे घर जिवंत झाले.

या घरात राखीने अनेक वाद केले, वक्तव्य केली मुख्य म्हणजे तिने या घरातच तिच्या नवऱ्याला संपूर्ण जगासमोर आणले होते. घरातून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांमध्येच ते दोघं वेगळे देखील झाले. राखीला प्रकाशझोतात कसे राहायचे हे माहित असल्याने ती बरोबर मीडियामध्ये गाजत असते. पुन्हा एकदा राखी तिच्या एका अत्रनगी व्यक्तव्यामुळे गाजत आहे.

लवकरच होळीचा सण येत आहे. याच निमित्ताने राखीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या होळीच्या आठवणींना उजाळा दिला. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, लहान असताना ती कंडोमला फुगे समजून त्याने होळी खेळायची. या कंडोममध्ये ती पाणी भरून लोकांवर फेकायची. ती म्हणाली की, “मी लहान असताना मला आमच्या घरात काही फुगे सापडले आणि मी त्यात रंगाचे पाणी भरून लोकांवर फेकण्यास सुरुवात केली. ते पाहून लोकांनी मला शिव्या दियाला सुरुवात केली. मी त्यांना म्हणत होते की बुरा ना मनो होली हैं. त्यावर ते लोकं मला म्हणत होते की, मूर्ख मुली मार खायचा आहे का? मी विचारले का होली आहे. त्यानंतर मला समजले की, ते फुगे नाही तर कंडोम आहे.”

पुढे राखीने तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबद्दल सांगताना तिचे काही भयानक अनुभव देखील सांगितले. ती म्हणाली, “जेव्हा मी या क्षेत्रात आली तेव्हा कॉस्मॅटिक सर्जरीचे खूप फॅड होते. मी 16 वर्षाची असतानाच मी माझी ब्रेस्ट सर्जरी केली होती. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा भयंकर अनुभव होता.” बॉलिवूडमध्ये येण्यासाठी राखीने खूप संघर्ष केला आहे. तिने अनेक मोठ्या पार्ट्यांमध्ये वेट्रेसचे काम देखील केले. राखी अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग करताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राखी सावंतबद्दल प्रश्न विचारताच संतापला मिका सिंग, थेट पत्रकाराला केली शिवीगाळ
अभिनेत्री राखी सावंतला व्हायचंय आई! म्हणाली, ‘प्रेग्नेंट झाल्यावर दुसऱ्याच दिवशी…’

हे देखील वाचा