Monday, June 23, 2025
Home अन्य काय सांगता! डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार ‘द रॉक’ होऊ इच्छितो अमेरिकाचा राष्ट्राध्यक्ष?

काय सांगता! डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार ‘द रॉक’ होऊ इच्छितो अमेरिकाचा राष्ट्राध्यक्ष?

डब्ल्यूडब्ल्यूई मधील पैलवान आणि आत्ता हॉलिवूड मधील अभिनेता डवेन जॉनसन सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे खूप चर्चेत आहे. त्याने असे म्हटले होते की,जर मला‌ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी मिळाली तर देशातील विकासासाठी सन्मानाची गोष्ट असेल. त्यानी सांगितले होते की, अमेरिकेतील जवळपास अर्ध्या लोकसंख्येला असे वाटते की, मी राष्ट्रपती पदासाठी अर्ज करावा.

डब्ल्यूडब्ल्यूई मधील पैलवानापासून ते अभिनेता बनलेला डवेन जॉनसन याने इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती, त्यात त्याने असे सांगितले होते की, “अमेरिकेतील जवळपास 46 टक्के जनता त्याला राष्ट्रपती या पदासाठी समर्थन करतील.” जॉनसन याला ‘द रॉक’ या नावाने देखील ओळखले जाते.

यासोबतच त्यांनी पुढे लिहिले की,” मला नाही वाटत की, आपल्या संस्थापक सदस्यांनी कधी हा विचार केला असेल की, 6 फूट चार इंचीचा, टक्कल पडलेला, अर्धा अश्वेत तसेच अत्यंत फनी बॅग घेणारा कोणता व्यक्ती आपल्या क्लबमध्ये सामील होईल. परंतु भविष्यात जर असे कधी झाले तर लोकांची सेवा करण्यासाठी ही माझ्यासाठी एक सन्मानाची गोष्ट असेल.”

त्याचे वडील हे अश्वेत होते, तर आई ही श्वेत होती. त्यामुळे त्याचा त्वचेचा रंग सावळा आहे. तो कमरेला एक फनी बॅग बांधण्याची स्टाईलमुळे खूपच प्रसिद्ध आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा अभिनेत्याने त्याला अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली.

हे देखील वाचा