लॉकडाऊनमध्ये हॉलिवूड सुपरस्टार विल स्मिथच्या बॉडीची झाली वाईट अवस्था, शर्टलेस फोटो शेअर करत म्हणाला…

Hollywood actor will smith's shirtless photo viral


हॉलिवूड सुपरस्टार विल स्मिथ हा इतर कलाकारांप्रमाणेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असतो. नुकतेच त्याने केलेल्या एका पोस्टमुळे तो सर्वत्र चर्चित आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचा एका शर्टलेस फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. लॉकडाऊनमध्ये झालेल्या त्याच्या शरीरातील बदल या फोटोमधून दिसत आहेत.

या फोटोमध्ये स्मिथने शॉर्ट्स घातले आहे. तसेच जॅकेटही घातले आहे. हे संपूर्ण जॅकेट ओपन आहे. त्याचा हा फोटो पाहून असे वाटत आहे की, तो कोणाशी तरी बोलत आहे. त्याचा हा कॅंडिड फोटो काढला आहे. विलने हा फोटो शेअर करून खऱ्या गोष्टी त्याच्या चाहत्यांना सांगितल्या आहेत.

विलने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “मी तुम्हा सगळ्यांना खरे सांगत आहे की, मी माझ्या आयुष्यातील आतापर्यंतच्या अत्यंत वाईट शेपमध्ये आहे.” विलच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकार देखील प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण म्हणत आहे की, एवढा पण वाईट फोटो नाहीये, तर काही जण म्हणतायेत की, तुझ्या चेहऱ्यावरवरील हावभाव तुझ्या कॅप्शनला मॅच होत आहेत.

विल हा फिटनेसकडे खूप लक्ष देत असतो. त्याच्या एका मुलाखती दरम्यान त्याने सांगितले होते की, तो वर्क आउटवर खूप लक्ष देतो. एकदा शूटिंग दरम्यान त्याचा पाय तुटला होता.

त्यावेळी विलने सांगितले होते की, “मला माहित होते की, हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा चित्रपट असणार आहे. त्यावेळी जखम झाल्यामुळे मी खूप घाबरलो होतो कारण ते माझ्या चित्रपटासाठी योग्य नव्हते.”

विलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने मोहम्मद अलीच्या बायोपिकने सर्वांचे मन जिंकले होते. सोबतच त्याने ‘मॅन इन ब्लॅक’, ‘स्टूडंट ऑफ द एअर 2’, ‘बॅड बॉईज’, ‘द कराटे किड्स’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्याचा मराठमोळा सिद्धू लहानपणापासून होता दिवाना; त्याच व्यक्तीबरोबर मिळाली काम करण्याची संधी

-‘ओम शांती ओम’ या पहिल्या चित्रपटासाठी दीपिका पदुकोणने दिले नव्हते ऑडिशन, मुलाखतीत केला खुलासा

-जेव्हा सेटवर दयाबेनला ‘ए पागल औरत’ बोलणे जेठालालला पडले होते भलतेच महाग!


Leave A Reply

Your email address will not be published.