Saturday, August 2, 2025
Home हॉलीवूड एकदम जबराट! एंजेलिना जोलीने केले सर्वात खतरनाक फोटोशूट; तब्बल १८ मिनिटे शरीरावर होत्या मधमाश्या

एकदम जबराट! एंजेलिना जोलीने केले सर्वात खतरनाक फोटोशूट; तब्बल १८ मिनिटे शरीरावर होत्या मधमाश्या

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एंजेलिना जोली आपल्या सुंदरतेमुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असायची. मात्र, आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने सर्वात विचित्र आणि आव्हानात्मक फोटोशूट केले. आता सोशल मीडियावर सर्वत्र हाच विषय चर्चा रंगवू लागला आहे. चर्चेचे मुख्य कारण म्हणजे, या फोटोशूटमध्ये मधमाश्यांची उपस्थिती.

वास्तविक, एंजेलिनाने ‘जागतिक मधमाशी दिना’निमित्त हे फोटोशूट केले आहे. यासाठी अभिनेत्रीला सुमारे १८ मिनिटे मधमाश्यांना आपल्या शरीरावर ठेवावे लागले. तसेच, हे शूट नॅशनल जिओग्राफिकच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

काळजीपूर्वक करण्यात आलंय शूट
फोटोग्राफर आणि मधमाश्या पाळणाऱ्या डॅन विंटर्सच्या मते, मधमाश्यांना शांत ठेवण्यासाठी आणि त्यांना एंजेलिनावर झुंबड घालण्यापासून आणि चावण्यापासून रोखण्यासाठी, एक विशेष योजना केली गेली होती. शूट अत्यंत काळजीपूर्वक पूर्ण करण्यात आले आहे.

फक्त डोकं हलवताना दिसली एंजेलिना
नॅशनल जिओग्राफिकने या फोटोशूटचा एक व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात आपण पाहू शकतो की, एंजेलिनाचे शरीर एका वस्तूने झाकलेले आहे आणि शेकडो मधमाश्या त्यावर चालत आहेत. या मधमाश्या तिच्या खांद्यावर आणि चेहऱ्यावर चालताना आणि गोंधळ करताना दिसत आहेत. यावेळी, अभिनेत्री फक्त डोके वर आणि खाली हलवित असल्याचे दिसले.

शूटिंगसाठी केली होती अशी योजना
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये फोटोग्राफरने सांगितले की, त्यासाठी त्याने कशी तयारी केली होती. त्याने सांगितले की, शूटिंगसाठी इटालियन मधमाश्या वापरल्या गेल्या, ज्या शूटिंगच्या वेळी शांत होत्या. एंजेलिनाला सोडून शूट करणाऱ्या इतर कामगार सदस्यांनी प्रोटेक्टिव्ह किट परिधान केले होते. तसेच, मधमाश्यांना शांत ठेवण्यासाठी वातावरण शांत आणि तिथे बराच अंधारही ठेवण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने समुद्रकिनारी केला ‘अब के बरस’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहून चाहतेही भलतेच खुश

-‘मुन्नी’ स्वत:लाच म्हणाली ‘फुलांपेक्षा सुंदर’, नेटकऱ्यांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच

हे देखील वाचा