Friday, March 29, 2024

ऐकावं ते नवलंच! हॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने केले तब्बल ८ वेळा लग्न, पण घटस्फोट घेतला फक्त एकासोबत

हॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी चित्रपटात उत्तम कामगिरी केली आणि आपले नाव खूप कमावले. परंतु काही अभिनेत्री या आपल्या घवघवीत कारकिर्दीसोबतच आपल्या खासगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत आल्या होत्या. यातीलच एक अभिनेत्री म्हणजेे एलिझाबेथ टेलर होय. या लेखात आपण त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.

हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांना आजही त्यांचे चाहते विसरलेले नाही. हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांना त्यांचे चाहते लिज टेलर नावाने हाक मारायचे. अनेक चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री एलिझाबेथ यांनी त्यांच्या विवाहांमुळे सर्वाधिक प्रसिद्धी मिळविली होती. त्या एक अत्यंत सुंदर, आणि उत्तम कलाकार होत्या. परंतु जितकी त्यांची चित्रपट कारकीर्द उत्तम राहिली, त्याउलट त्यांच्या वैवाहिक जीवनात खूपच चढ- उतार आले. खरं तर, एलिझाबेथ टेलर यांनी एकूण आठ विवाह केले होते. पहिले लग्न फक्त नऊ महिने चालले, आणि नंतर घटस्फोट झाला. हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आठ विवाह करणाऱ्या एलिझाबेथ यांचा हा पहिला, आणि शेवटचा घटस्फोट होता.

हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांनी आठ लग्नांमध्ये दोन लग्न एकाच व्यक्तीसोबत केले होते. या हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ यांनी आठ व्यक्तींशी सात वेळा लग्न केले होते. एलिझाबेथ यांनी प्रथम १९५० साली कॉनराड निकी हिल्टन यांच्याशी लग्न केले होते. पण लग्नानंतर लगेचच, पती-पत्नीमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली होती. शेवटी दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता.

त्यानंतर त्यांनी मायकल वाइल्डिंग यांच्याशी १९५२ मध्ये दुसरे लग्न केले होते. या लग्नाची खूप चर्चा झाली होती, त्यांचे पती वाइल्डिंग त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. पण काही काळानंतर, वादामुळे एलिझा या मायकल वाइल्डिंग यांच्यापासून विभक्त झाल्या. या एकाकीपणामध्ये, मायकल टॉड त्यावेळी त्यांच्या जवळ आले होते, आणि या काळात त्यांच्या अनेक भेटीगाठी झाल्या. डेटिंगनंतर एलिझाबेथ यांनी १९५७ साली तिसरे लग्न मायकल टॉड यांच्याशी केले होते. पण काही वर्षानंतरच टॉड यांच्या निधनानंतर एलिझाबेथ टेलर यांची जवळीक एडी फिशर यांच्याशी वाढली होती. फिशर यांचे आधीच लग्न झाले होते. असे असूनही एलिझा आणि फिशर खूपच जवळ आले आणि एलिझाबेथ यांनी चौथे लग्न १९५९ फिशर यांच्याशी केले होते. त्यांचे लग्न बऱ्याचदा अपयशी ठरूनही त्यांनी कोणत्याही पतीसोबत घटस्फोट घेतला नव्हता.

फिशर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर, एलिझाबेथ यांचे नाव हॉलिवूड अभिनेता रिचर्ड बर्टन यांच्याशी जोडले गेले होते. असे म्हणतात की, एलिझाबेथ आणि रिचर्ड बर्टन दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. मग दोघांनीही संमतीने १९६४ लग्न केले होते. एलिझा यांचे हे पाचवे लग्न होते. पण रिचर्ड बर्टन यांच्याशीही, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही, आणि त्यांचा घटस्फोट झाला होता.

पण एलिझाबेथ-रिचर्ड यांच्यातील प्रेमामुळे हे दोघे पुन्हा जवळ आले, आणि सुमारे १६ महिन्यानंतर १९७५ मध्ये दोघांनी पुन्हा लग्न केले होते. एलिझाबेथ यांचे हे सहावे लग्न होते. यानंतर एलिझाबेथ यांनी १९७६ जॉन वॉर्नर यांच्याशी लग्न झाले, परंतु काही दिवसातच दोघांमध्ये वाद वाढला, आणि नाते वेगळे होण्याच्या दिशेने वाढू लागले, आणि शेवटी दोघेही वेगळे झाले. एलिझाबेथ यांनी १९९१ मध्ये आठवे आणि शेवटचे लग्न लॅरी फोर्टेन्स्की यांच्याशी केले.

एलिझाबेथ यांचे नाव हॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. इंग्लंडच्या राणीने त्यांना ‘डॅम ’ ही पदवी दिली आहे. हे पुरुषांना दिलेल्या ‘सर’ या पदवीसारखेच, महिलांना दिली गेलेले पदवी आहे. त्याशिवाय अभिनेत्रीला दोन ऑस्कर पुरस्कारही देण्यात आले आहेत. त्यांनी आयुष्यात ५० हॉलिवूड चित्रपट केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध संगीत कंपनीचे मालक गुलशन कुमार यांच्यावर मंदिरातून बाहेर येताच झाडल्या होत्या १६ गोळ्या, वाचा त्यांची कहाणी

हे देखील वाचा