अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री किम कर्दाशियन ही तिच्या बोल्डनेसमुळे खूपच चर्चित आहे. जेव्हा ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, तेव्हा तिचे फोटो सर्वत्र धुमाकूळ घालत असतात. तिच्या फिटनेस आणि परफेक्ट फिगरमुळे ती अनेकांच्या मनात घर करून आहे. तिचा कोणताही फोटो शेअर होता क्षणीच व्हायरल होत असतो. सोशल मीडियावर देखील तिचे कोटीमध्ये फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे तिचे फोटो खूप कमी वेळात व्हायरल होत असतात. आता देखील किमचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. पण या फोटोमुळे ती खूप ट्रोल झाली आहे.
या फोटोमध्ये तिने लाल रंगाच्या ड्रेसवर ओम असे लिहिलेले डिझायनर कानातले घातले आहे. किमचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. किमवर हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप लावला जात आहे. वयाच्या 40 व्या वर्षी तिने हे असे कृत्य केले आहे, त्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे.
— Kim Kardashian West (@KimKardashian) May 23, 2021
किमचे कोणतेही फोटो शेअर होता क्षणीच व्हायरल होत असतात. तिने हे फोटो तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोवर एका युजरने कमेंट केली आहे की, “आता हे सांगण्याची योग्य वेळ आहे की, ओम हा केवळ दागिना नाहीये, तर ते हिंदू धर्माचे एक पवित्र चिन्ह आहे.”
नुकतेच फोर्ब्समधून आलेल्या माहितीनुसार किम कर्दाशियन आता इंडियन करन्सीमध्ये 100 कोटी एवढी संपत्ती असणारी कलाकार झाली आहे. किम ही आता अधिकृतरीत्या अब्जाधीश बनली आहे. टीव्ही शो, मालिका या सोबतच किमचे आणखी दोन मोठे व्यवसाय आहेत. यामुळे तिला अब्जाधीश बनायला जास्त मदत झाली आहे. तिने 2017 साली तिच्या कॉस्मेटिक व्यावसायाला सुरुवात केली होती. यामुळे तिला खूप नफा झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मूर्ती लहान, कीर्ती महान! अवघ्या १९ व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर झाले २ कोटी फॉलोवर्स
-नेहा कक्करने केला विना मेकअप लूक शेअर, पती रोहनप्रीतच्या कमेंटने जिंकली सर्वांची मने
-निक जोनासच्या चेहऱ्यावर प्रियांकाच्या चोप्राच्या ‘किस’चे निशाण! नेटकऱ्यांनी पाडला प्रश्नांचा पाऊस










