‘लिंडसे लोहान’ ही हॉलीवूड चित्रपटातील अभिनेत्री आणि निर्माती आहे. ती वयाच्या दहाव्या वर्षांपासून चित्रपटांतून अभिनय करीत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. ती तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील विविध अपडेट्स शेअर करत असते. तिने नुकताच तिचा 36 वा वाढदिवस साजरा केला. त्यासोबतच सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत तिने एक गुड न्यूजही दिली.
अभिनेत्री लिंडसे लोहान हिने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी देऊन चाहत्यांसोबत आनंद व्यक्त केला आहे. ही अभिनेत्री पहिल्यांदाच आई होणार आहे. गेल्या वर्षी तिने एका बिझनेसमनसोबत लग्न केले होते.
लिंडसे लोहान हीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आम्ही धन्य आणि उत्साहित आहोत. अभिनेत्रीने नवजात बाळाच्या ड्रेसचा फोटोही शेअर केला असून त्यावर ‘कमिंग सून’ असे लिहिले आहे. तिने जुलै 2022 मध्ये एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या लग्नाची बातमी दिली होती. तुर्कीतील तिच्या हनीमूनचे सर्व फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.
View this post on Instagram
तिच्या लग्नाची घोषणा करताना लोहानने लिहिले, ‘मी जगातील सर्वात भाग्यवान महिला आहे, मला तु भेटला. तू माझा नवरा आहेस. माझे जीवन आणि सर्व काही. प्रत्येक स्त्रीला हे दररोज जाणवते. या जोडप्याने न्यू यॉर्क शहरात त्यांच्या नेटफ्लिक्स चित्रपट ‘फॉलिंग फॉर ख्रिसमस’ च्या स्क्रीनिंगमध्ये जोडप्याच्या रूपात रेड कार्पेटवर पदार्पण केले. बऱ्याच दिवसांनंतर ही अभिनेत्री पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
View this post on Instagram
‘मीन गर्ल्स’ आणि ‘द पॅरेंट ट्रॅप’ या कल्ट क्लासिक्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री लिंडसे लोहानने अलीकडेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. एप्रिल 2022 मध्ये, तिने ‘द लोहडाउन’ पॉडकास्ट सुरू केले. लवकरच ही अभिनेत्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात दिसणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असेल असे बोलले जात आहे. (hollywood-actress-lindsay-lohan-share-pregnancy-news-on-social-media)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्रीला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत, कलाकारांकडून काळजी घेण्याचं आवाहन
Bhabiji Ghar Par Hai : मालिकेने गाठला मोठा टप्पा, कलाकारांनी प्रेक्षकांचे हात जोडून मानले आभार