बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली आहे. प्रियांका केवळ बॉलीवूड-हॉलीवूड अभिनेत्रीच नाही तर युनिसेफची गुडविल ऍम्बेसेडर देखील आहे. युनिसेफकडून सुरू असलेल्या कामांसाठी ती अनेकदा देशांतर्गत आणि परदेशी भागांना भेटी देते. सध्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आणि आसपासच्या परिसरात प्रियांका फिरस्तीवर आहे. यादरम्यान तिने औरंगाबाद गावातील शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि तिचा अनुभव शेअर केला.
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री युनिसेफ लिहिलेल्या टी-शर्टमध्ये टिपिकल देसी स्टाईलमध्ये दिसत आहे. प्रियांकाने सरकारी शाळेत सुरू असलेले काम पाहिले आणि तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. प्रियांकाने पोस्ट करत लिहिले, “जसे की आपण नेहमी म्हणतो की, शिक्षणामुळे आयुष्य बदलते. हे एक फॅक्ट आहे आणि जेव्हा लैंगिक नियम आणि परंपरा मोडल्या जातात तेव्हा नवीन पिढीच्या विचारात बदल घडवून आणतात.”
View this post on Instagram
प्रियांका चोप्राने पुढे लिहिले की, “मी औरंगाबाद गावात एका शाळेला भेट देताना पाहिले की, तेथे एक अनोखा कार्यक्रम सुरू आहे ज्याचा उद्देश बालमजुरी थांबवणे आणि दैनंदिन जीवनात लैंगिक समानता वाढवणे आहे. जेणेकरून ही मुले मोठी झाल्यावर त्यांना उदरनिर्वाहाच्या समान संधी मिळतील. प्रत्येक केंद्रात मुलांना जीवनकौशल्ये शिकवली जात आहेत, 60 विविध तंत्रज्ञानाचा त्यात सहभाग आहे. सर्व विद्यार्थी आपापले काम शिकण्यात मग्न आहेत.”
View this post on Instagram
प्रियांकाने पुढे लिहिले की, “मीना मंचसोबतच्या माझ्या संभाषणादरम्यान, युवा सदस्यांनीही हिंसाचार संपवण्यासाठी दमदार परफॉर्मन्स दिला. हिंसाचार थांबवण्याची जबाबदारी समजून घेण्याच्या दिशेने आहे. मी खूप प्रभावित झाली. अशी साधने आपण देशभरातील सर्व मुलांना कशी पुरवू शकतो याचा विचार करायला हवा… कारण बदलाची सुरुवात लहानपणापासून व्हायला हवी.” प्रियांका शाळकरी मुलींसोबत हायफाय करतानाही दिसली. (hollywood actress priyanka chopra visit a school in aurangabad village impressed by unique program)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कॅटरिना अन् विकीच्या लग्नात झाले हाेते जाेरदार भांडणं, अभिनेत्रीनं केला खुलासा
लखनऊमध्ये प्रियांकाचा का होतोय विरोध? पोस्टर लावून विरोधक म्हणाले,’नवाबांच्या शहरात…’