Monday, July 8, 2024

काळीज तोडणारी बातमी! सिनेविश्व गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, चाहते शोकसागरात

कलाविश्वातून अशा अनेक बातम्या येत असतात, ज्यांच्यामुळे आपण कधी आनंदी होतो, तर कधी आपल्या डोळ्यांतून अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. आताही अशीच बातमी आली आहे, ज्यामुळे कलाविश्वाला धक्काच बसला आहे. रविवारी (दि. ०७ ऑगस्ट) कलाविश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. हॉलिवूड सिनेविश्वाने एक प्रसिद्ध कलाकार गमावला आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री रोसेना क्रिस्टियनसेन यांचे निधन झाले आहे. त्या ७१ वर्षांच्या होत्या. रोसेना यांच्या निधनामुळे कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनावर चाहत्यांसोबत कलाकारही दु:ख व्यक्त करत आहेत.

परदेशी माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्रीचे निधन मागील महिन्यात १४ जुलै रोजी लँकेस्टर, कॅलिफोर्निया येथे झाले होते. रोसेना क्रिस्टियनसेन (Roseanna Christiansen) यांच्या निधनाचे कोणतेही कारण समोर आले नसल्याचे म्हटले जात आहे.

रोसेना यांना १९८२पासून ते १९९१पर्यंत डलाल्स सीरिजमध्ये टेरेसा या भूमिकेसाठी ओळखले जाते. रोसेना या शोमध्ये सन १९८२मध्ये सहाव्या सिझनमध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी या सीरिजमध्ये १९९१पर्यंत १४व्या आणि शेवटच्या सिझनपर्यंत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. त्या या शोच्या नऊ सिझनमध्ये एकूण ११२ एपिसोडमध्ये झळकल्या होत्या.

रोसेना क्रिस्टियनसेन यांची कारकीर्द
रोसेना क्रिस्टियनसेन यांच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी सीबीएसचा प्रसिद्ध प्राईमटाईम शो डलासमधील आपल्या भूमिकेपूर्वी १९८१ मध्ये ‘द जेफरसन’च्या तीन एपिसोडमध्ये कामवाल्या बाईची भूमिका साकारली होती. त्या या शोमध्ये फ्लोरेन्स म्हणजेच मार्ला गिब्स यांनी शो सोडल्यानंतर सामील झाल्या होत्या. त्यानंतर गिब्स यांनी शोमध्ये पुनरागमन केले. पुढे हा शो पुढील ४ एपिसोडपर्यंत चालला होता. याव्यतिरिक्त क्रिस्टियनसेनने टीव्हीमध्येही काम केले होते. त्यांनी ‘मॅटलॉक’, ‘सीबीएस समर प्लेहाऊस’ आणि ‘ए ईअर इन द लाईफ’ यांसारख्या शोमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
सीनच इतका इंटीमेट की, भावनेच्या भरात वाहवत गेला रणदीप हुड्डा; पुढं अभिनेत्रीसोबत जे घडलं, ते…
अमिषासोबत फोटोत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला ओळखलं का? जगातल्या हँडसम अभिनेत्यांमध्ये होते त्याची गणना
‘या’ कारणामुळे माधुरी दीक्षितच्या स्थळाला नाही म्हणाले होते सुरेश वाडकर, कारण वाचून व्हाल थक्क

हे देखील वाचा