हॉलिवूड अभिनेत्री जेसिका वॉल्टर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. एमी पुरस्कारप्राप्त अभिनेत्री बऱ्याच टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. याशिवाय अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. विशेषत: ‘अरेस्टेड डेव्हलपमेंट’ मधील अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. शोमध्ये जेसिका यांनी आजी ‘लुसिल ब्लथ’ ची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
जेसिका वॉल्टर यांच्या एजंटने गुरुवारी (25 मार्च) त्यांच्या निधनाबद्दल एएफपीला माहिती दिली आहे. त्याच वेळी, जेसिका यांची मुलगी ब्रूक बोमन हिनेही तिच्या आईच्या मृत्यूची पुष्टी केली. ती म्हणाली, “मी माझ्या प्रिय आई जेसिकाच्या निधनाबद्दल जड अंतःकरणाने पुष्टी करते.” ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनेही जेसिका वॉल्टर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
नेटफ्लिक्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने जेसिका वॉल्टर यांच्या मृत्यूवर एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे, “त्यांच्या आवाजामध्ये कोणतीच शंका नव्हती. त्यांची प्रतिभा निर्विवाद होती. जेसिका वॉल्टर आमच्यासोबत आपली भेट शेअर केल्याबद्दल धन्यवाद. शांतता, रेस्ट इन पीस.”
Her voice was unmistakable. Her talent was undeniable.
Thank you for sharing your gifts with us Jessica Walter. Rest in peace, legend. pic.twitter.com/cleCoiXCCL
— Netflix (@netflix) March 25, 2021
वॉल्टर यांचा जन्म न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथे एस्थर आणि डेव्हिड वॉल्टर यांच्या घरात झाला. त्यांनी न्यूयॉर्क सिटीच्या हायस्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टमध्ये शिक्षण घेतले. त्या ज्यू कुटुंबातून होत्या आणि त्यांची आई युएसएसआरमधील होती. त्यांचा भाऊ रिचर्ड वॉल्टर एक पटकथा लेखक आहे.
जेसिका वॉल्टर या ‘प्ले मिस्टी फॉर मी’, ‘ग्रँड प्रिक्स’, आणि ‘द ग्रुप’ यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी विशेष प्रसिद्ध होत्या. त्यांनी न्यूयॉर्क शहरातील नेबरहुड प्लेहाउस स्कूल ऑफ थिएटरमध्ये अभिनयाचे धडे घेतले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोठी बातमी! आमिर, माधवननंतर आता मिलिंद सोमणही कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली माहिती
-‘टीव्ही कलाकारांसोबत होतो भेदभाव, सुशांतने रस्ता मोकळा केला’ म्हणत गुरमीत चौधरीचा बॉलिवूडवर आरोप