Tuesday, May 21, 2024

दुख:द! स्टँडअप कॉमेडियन गॅलाघर यांचे निधन, वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अमेरिकन कॉमेडियन गॅलाघर यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. ते त्यांच्या वाटरमेलन-स्मॅशिंग कॉमेडीसाठी ओळखले जायचे. 1980 च्या दशकात त्यांनी स्टँडअप कॉमेडीमधून खूप लोकप्रियता मिळवली. त्यांचे मॅनेजर क्रेग मार्क्वार्डो यांनी सांगितले की, गॅलाघर यांचा शुक्रवारी (दि. 11 नाेव्हेंबर)ला सकाळी मृत्यू झाला. गॅलाघर 76 वर्षांचे होते आणि बऱ्याच दिवसापासून आजारी होते. कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचे निधन झाले. 

‘ऍन अनसेन्सर्ड इव्हनिंग’ या कॉमेडीद्वारे गॅलेघरयांनी मिळवली लाेकप्रियता
सण 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला ‘ऍन अनसेन्सर्ड इव्हनिंग’ या कॉमेडीद्वारे त्यांनी लोकप्रियता मिळवली. क्रेग मार्क्वार्डो यांनी सांगितले की,” केबल टीव्हीवर प्रसारित होणारा हा पहिला कॉमेडी शाे हाेता.” गॅलाघर (comedian gallagher) यांचा सर्वात प्रसिद्ध बिटमध्ये हाताने बनवलेल्या स्लेजहॅमरचा समावेश होता ज्याला त्यांनी ‘स्लेज-ओ-मॅटिक’ म्हटले. त्याचा उपयोग ते प्रेक्षकांवर स्प्रेसाठी करत हाेते.

गॅलेघर स्लेजहॅमरद्वारे प्रेक्षकांना करत असे आकर्षित
क्रेग मार्क्वार्डोच्या म्हणण्यानुसार, “गॅलेघर स्लेजहॅमरद्वारे प्रेक्षकांना आकर्षित करत असे.” गॅलाघर हा फोर्ट ब्रॅग, नॉर्थ कॅरोलिना येथील रहिवासी होते. माध्यमातील वृत्तानुसार, लॉस एंजेलिसमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठातून रसायनशास्त्र अभियांत्रिकी पदवी मिळविली. गॅलाघरने सनसेट स्ट्रिपवरील ऐतिहासिक ठिकाणी कॉमेडी स्टोअरमध्ये त्यांच्या विनोदी अभिनयात प्रभुत्व मिळवले.

गॅलाघर यांनी आपल्या सिग्नेचर शैलीद्वारे वेधले प्रेक्षकांचे लक्ष
सण 1975मध्ये जेव्हा त्यांनी जॉनी कार्सनच्या प्रसिद्ध ‘द टुनाइट शो’ मध्ये प्रॉप कॉमेडीची सिग्नेचर शैली सादर केली तेव्हा गॅलाघरच्या कॉमेडीकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले. टीव्हीच्या माध्यमातून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 1978 मध्ये, त्यांनी ‘द माइक डग्लस शो’ वर परफॉर्मेंस केले आणि पुढच्या वर्षी ‘द मर्व्ह ग्रिफिन शो’मध्ये दिसले.

सण 1980 च्या दशकात त्यांचा शोटाइम कॉमेडी स्पेशल होता. त्यांनी 27 वर्षांत टीव्हीसाठी भरपूर शोमध्ये काम केले आहे. (hollywood comedian gallagher passed away)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मुलीचे नाव केले उघड! बिपाशा बासू-करण सिंगने शेअर केली मुलीची पहिली झलक

माहिरा शर्माने बोल्डनेसची हद्दच केली पार, पाहा बोल्ड फोटोशूट

हे देखील वाचा