हॉलिवूडमधून एक दुः खद बातमी समोर येत आहे. सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज पीकी ब्लाइंडर्स आणि हॅरी पॉटरमध्ये दिसलेल्या अभिनेत्री हेलेन मॅक्रोरी यांचे निधन झाले आहे. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्या बर्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनानंतर अनेक हॉलिवूड- बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.
अभिनेत्रीचे पती डॅमियन लुईस यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. त्यांनी सांगितले की, अभिनेत्री कर्करोगासारख्या आजाराने त्यांची लढाई निर्भयपणे लढल्या. आमच्या राहत्या घरी त्यांचा मृत्यू झाला आहे.
— Damian Lewis (@lewis_damian) April 16, 2021
पती डॅमियन यांनी ट्विटरवर लिहिले की, “कर्करोगाविरुद्ध जोरदार लढा दिल्यानंतर सुंदर आणि सामर्थ्यवान महिला हेलेन मॅक्रोरी यांनी जगाला निरोप दिला आहे. हे मला सांगताना फार वाईट वाटत आहे. मित्र आणि कुटुंबासोबत असताना त्यांचे घरात निधन झाले. आयुष्य जगल्यासारखेच त्यांचा मृत्यू झाला. निर्भयपणे. देव जाणतो की आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. आम्ही स्वत: ला भाग्यवान समजतो की आपल्या आयुष्यात त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्या खूप चमकल्या. आता हवेसोबत वाहत जा. धन्यवाद.”
This is one of the most heartbreaking goodbyes I’ve read. RIP Helen McCory. https://t.co/xfvvAZuna7
— Hansal Mehta (@mehtahansal) April 17, 2021
हॉलिवूड सेलेब्स आणि त्यांचे चित्रपट आणि टीव्ही शो निर्मात्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. बॉलिवूडमध्येही हेलेनच्या निधनाच्या बातमीनंतर शोककळा पसरली आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी याबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच चाहतेही ट्विटरवर हेलन यांना श्रद्धांजली वाहात आहेत. हेलेन ह्या ब्रिटनमधील एक अतिशय प्रतिष्ठित अभिनेत्री होत्या, जिथे अनेक वेगवेगळ्या भूमिका करून अभिनेत्रींनी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-