मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगाला प्रभावित केले. त्यातून कोणतीही मनोरंजनसृष्टी देखील वाचू शकली नाही. मग हॉलिवूड तरी कसे अपवाद राहील. कोरोनामुळे हॉलीवूडला देखील मोठा फटका बसला आहे. मात्र असे असले तरी हॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी या काळात देखील बक्कळ कमाई केली आहे. हॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी कमाईच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देखील मात दिली आहे. आज आपण या लेखातून २०२१ – २०२२ वर्षातील सरावात जास्त कमाई करणाऱ्या हॉलिवूडच्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.
स्कार्लेट जोहानसन :
स्कार्लेट जोहानसन ही २०१८ वर्षानंतर सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री ठरत या यादीत सर्वात वर आहे. तिला हे यश तिची मेहनत आणि तिचे प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात मिळणारा घवघवित प्रतिसाद यामुळे मिळाले आहे. स्कार्लेट ‘ब्लॅक विडो’, ‘द एवेंजर्स’, ‘अंडर द स्किन’ आदी मोठ्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. ती अभिनयासोबतच अनेक संस्थांना मोठे दान देखील देते.
सोफिया वेरगारा :
एक अभिनेत्री, निर्माती असणारी सोफिया वेरगारा ही हॉलिवूडमधील सर्वात जास्त फी घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोफिया ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ मध्ये परीक्षक असून हॉलिवूडमधील एक यशस्वी निर्माती देखील आहे. ती जाहिराती, सिनेमे आणि इतर अनेक व्यवसायांमधून पैसे कमावते.
रीज विदरस्पून :
गोल्डन ग्लोब अवॉर्ड विनर रीज विदरस्पूनने मागच्या वर्षी २६९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ती जगातील अनेक महिलांना प्रेरित करत असते. अभिनेत्रीसोबतच ती एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. ९० च्या दशकातील ती सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
एंजेलिना जोली :
एंजेलिना जोलीचे संपूर्ण जगात कोट्यवधी चाहते आहेत. जगात तिची प्रसिद्धी आणि लोकप्रियता अमाप आहे. तिने तिच्या अभिनयमधून प्रचंड संपत्ती कमावली आहे. नोव्हेंबरमध्ये आलेल्या ‘द इटर्नल्स’मध्ये ती शेवटची दिसली होती.
गैल गैदोत :
वयाच्या १८ व्या वर्षी ‘मिस इज्राइल’चा ताज जिंकणाऱ्या गैल गैदोतचे जगभरात असंख्य चाहते आहेत. २०२० साली प्रदसरहित झालेला तिचा ‘वंडर वुमन-1984’ सिनेमा तुफान गाजला. मागच्या वर्षी तिने २३५ कोटी इतके पैसे कमावले.
जूलिया रॉबर्ट्स :
जूलिया रॉबर्ट्सला आतापर्यंत तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले असून, ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रत्येक प्रकारची भूमिका ती अगदी लीलया साकारत असते.
जेनिफर लॉरेन्स :
२०१५ आणि २०१६ वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री म्हणून जेनिफर ओळखली जाते. ३० वर्षीय जेनिफरने ‘हंगर गेम्स’ सोबत अनेक हिट सिनेमे आणि हिट सिरीजमध्ये काम केले आहे. तिने मागच्या वर्षी २०९ कोटी रुपये कमावले होते.
जेनिफर एनिस्टन :
जगातील सर्वात जास्त लोकप्रिय असणाऱ्या ‘फ्रेंड्स’ या सिरीजचा जेनिफर भाग होती. जेनिफर ५२ वर्षांची असली तरी तिची लोकप्रियता तुफान आहे. ती जाहिराती आणि अभिनयातून पैसे कमावते.
मेलीसा मैक्कार्थी :
मेलिसा एक उत्तम विनोदी अभिनेत्री, अभिनेत्री आणि निर्माती आहे. तिने दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकत इतर अनेक पुरस्कारांमध्ये नामांकन मिळवले आहे. ती नवनवीन प्रॉजेक्टच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावते.
केली कुओको :
३५ वर्षीय केली चित्रपटातील प्रत्येक सीनसाठी ७ कोटी रुपये घेते. तिने मागच्यावर्षी चित्रपटांमधून आणि जाहिरातींमधून जवळपास १८७ कोटी रुपये कमवले.
हेही वाचा-


