Saturday, June 29, 2024

मिस यूएसए चेल्सी क्रिस्टचा इमारतीवरून उडी मारल्याने मृत्यू, मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने केला शोक व्यक्त

मिस यूएसए २०१९ चेस्ली क्रिस्टचे रविवारी (३० जानेवारी) निधन झाले आहे. मिस यूएसए २०१९ चा किताब जिंकणारी आणि व्यवसायाने वकील असलेली अमेरिकन मॉडेल चेल्सी ख्रिस्त ३० वर्षांची होती. चेस्लीच्या निधनानंतर मिस युनिव्हर्स २०१९ बनलेल्या हरनाझ संधूने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. हरनाझ म्हणाली की, ही बातमी ऐकून तिचे हृदय तुटले. माध्यमांतील वृत्तानुसार, चेल्सीने ६० मजली इमारतीच्या २९व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिला घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर चेल्सी क्रिस्टने हरनाझची बॅकस्टेज मुलाखतही घेतली.

मिस युनिव्हर्स बनलेल्या हरनाझने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये चेल्सीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तिने लिहिले की, “ही हृदयद्रावक अविश्वसनीय बातमी आहे. तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान होता. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.”

चेल्सी क्रिस्टने सकाळी ७.१५ वाजता (यूएस वेळेनुसार) मॅनहॅटनमध्ये संशयास्पदरीत्या आत्महत्या केली. ६० मजली ओरियन बिल्डिंगमध्ये ९ व्या मजल्यावर तिचे अपार्टमेंट होते. २९ व्या मजल्यावर ती शेवटची दिसली होती. मात्र, तिने जीवन संपवण्याचा एवढा मोठा निर्णय का घेतला, याबाबत सुसाईड नोटमध्ये काहीही लिहिलेले नाही. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, तपास सुरू केला आहे.

चेल्सी पेशाने वकील होती. ती सामाजिक आणि फौजदारी न्याय सुधारणांच्या बाजूने होती. मानसिक आरोग्यावर ती बोलकी होती. अनेक मुलाखतींमध्ये ती त्याबद्दल बोलायची. चेल्सीच्या अचानक जाण्याने कुटुंब आणि चाहते आणि सर्वांनाच धक्का बसला आहे.

चेल्सीचा जॅक्सनचा जन्म मिशिगनमध्ये १९९१ मध्ये झाला आणि ती दक्षिण कॅरोलिनामध्ये मोठी झाली. तिने २०१७ मध्ये वेक फॉरेस्ट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून पदवी प्राप्त केली. २०१९ मध्ये चेल्सी क्रिस्टने नॉर्थ कॅरोलिनाचे प्रतिनिधित्व केले आणि मिस यूएसए २०१९ चे विजेतेपद पटकावले.

हेही वाचा :

हे देखील वाचा